facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / राजकारण की लोकशाहीचं वस्त्रहरण ?

राजकारण की लोकशाहीचं वस्त्रहरण ?

आवाज न्यूज नेटवर्क –

संपादकीय -आजच्या  काळात राजकारणाचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं झालं तर बरंच मागे जाऊन कानोसा घ्यायला हवा.स्वातंत्र्या नंतर आपलं सरकार चालवणाऱ्या नेत्यांकडे पाहिलं की ते लोकप्रतिनिधी किवा लोकसेवक अशी त्यांची प्रतिमा असायची .पण अनेक वर्ष ह्या प्रतिमेला काळिमा फासला जातोय आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून. आमच्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांवर केलेल्या कुरघोड्यांना आजकाल राजकारण म्हणत असावेत . कारण अगदी स्वत:च्या कृतीला साजेशी अशीच भाषाही आजकाल सभागृहे, सभा, परिषदा आणि मेळावे ह्यात दिसू लागलीये . कुठलाही पक्ष आज त्याला अपवाद राहिलेला नाही .पूर्वी शिवसेना पक्ष बाळासाहेबांच्या ‘वाणी’ने प्रसिद्ध केला .पण त्यांच्या भाषेला एक सांस्कृतिक वळण होतं . परंतु आजकालच्या  नेत्यांनी फक्त शिवराळपण जपलंय अस दिसतंय .संस्कारक्षम वातावरणात वाढल्या पोसलेल्या संघप्रणीत भाजप नेत्यांनी ही आता भाषेचा ताल सोडलाय अस वाटतय . अगदी  पिपरी-चिंचवड मनपा च्या २०१७ च्या निवडणुक धामधुमीत अशा शिवराळ भाषेची वैयातिक हमरी तुमरी आणि प्रसंगी ‘बा’चा ‘बा’ची, धराधरी आणि मारामारी च्या घटना पाहिल्या की स्वतःचं राजकारण करण्यासाठी लोकसेवेच्या नावाखाली ह्या लोकनेत्यांनी राजकारणाची दुकानं थाटलीयेत अस वाटतंय .व्यवसायातही अगदी खालच्या थरावर जाणारे लोक असतीलही पण आजच्या राजकारणात फक्त खालच्या स्तरावर राहून मतांसाठी दुकानदारी करणारे राजकाराणी उद्योगपती कमी नाहीत . मग अशा प्रकारच्या वागण्याला संसद  काय ,लोकसभा राज्यसभाच काय,तर साध्या पालिकेचे सभागृहही अपवाद नाही . पिंपरी चिंचवड पालिकेलाही महापौर आणि जेष्ठ नगरसेविका, २ माजी महापौर, विद्यमान महापौर व अन्य नगरसेवक यांची भांडणे अशी मोठी असंसकृत  परंपरा लाभली आहे . आरोप प्रत्यारोप, एकमेकाला धमक्या देणे , माईक खेचून घेणे, माईक आणि इतर वस्तू फेकून मारणे, शिवीगाळ करणे , अंगावर धावून जाणे आदि प्रकार करत आमच्या नेत्यांनी आमची लोकशाही अक्षरशः पायदळी तुडवली आहे. आणि अजूनही हे तुडवणे चालूच आहे . अगदी ताजा प्रसंग म्हणजे राष्ट्रवादीचे एक नगरसेवक आणि शिवसेनेच्या तिकिटावर निवडून  येऊन आता भाजप च्या तंबूत स्थिरावलेल्या एका नगरसेविके मध्ये चक्क सभागृहात अगदी सर्वसाधारण सभे दरम्यान रंगलेली हमरीतुमरी सर्वश्रुतच आहे. परंतु इथेच न थांबता हे कमी पडले  की काय म्हणून वर पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर अतिशय खालच्या पातळीवर चिखलफेक केली आहे. आजच्या राजकारणात स्त्री -पुरुष लोक प्रतिनिधी असा कुठलाही भेदाभेद नसला तरी एखाद्या स्त्री किवा पुरुषांच्या तोंडी एकमेकांसाठी इतकी खालच्या स्तरावरील भाषा वापरणे म्हणजे समाजकारणाच्या नावाखाली चाललेला हा राजकारणाचा गोरखधंदाही खूप खालच्या थाराला पोहचलाय हे सिद्ध होतंय. भ्रष्ट्राचाराच्या इतिहासचं गाठोडंच बरोबर घेऊन आलेले सत्ताधारी असोत की शालजोडीतली सुसंस्कृत भाषा लहानपणा पासून मनावर बिंबवलेले आणि नंतर राजकारणाच्या व्यवसायात पडलेले विरोधी पक्ष नेते असोत, दोघांनीही लोकशाहीचं अगदी सगळ्यासमक्ष  वस्त्रहरण केलय हेच खर ..आणि वर ह्या राजकारण्याची अपेक्षा आहे कि ह्यांना लोकांनी निवडून द्यावं. आता आपणच ठरवा की आपला प्रतिनिधी हा सुसंस्कृत, चारित्र्यवान सुवचनी आणि सकारात्मक समाजकारण करणारा हवा की राजकीय दुकानदारीची शिवराळ भाषा बोलून आणि अनिर्बंध वागुन लोकशाही पायदळी तुडवणारा?

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *