facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / सामान्यांची चड्डी-बनियन उतरवू नका: उद्धव

सामान्यांची चड्डी-बनियन उतरवू नका: उद्धव

नोटाबंदीनंतर स्वदेशातल्या भांडवलदार आणि धनदांडग्यांचे एका पैशाचेही नुकसान झाले नाही. त्यात सामान्य जनताच होरपळून निघाली. आता बेनामी संपत्तीबाबत सरकारने नक्की काय करायचे ठरवले आहे? असा सवाल करतानाच, ‘बेनामी संपत्तीच्या नावाखाली सामान्यांची चड्डी-बनियन उतरवू नका, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी बेनामी संपत्तीवर सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्याचे स्वागत करतानाच त्यावरून मोदी सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत. नेते, व्यापारी, उद्योजक, अंडरवर्ल्डचे लोक आणि अनिवासी भारतीय कर चुकवून मालमत्तांमध्ये पैसे गुंतवतात. त्यामुळे बेइमान नक्की कोणाला म्हणावे? असा सवाल त्यांनी केला आहे. बेनामी संपत्तीवाले सर्व काही कायद्याच्या चौकटीत बसवून नामानिराळे राहतील. त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. मात्र त्यात गरीब आणि मध्यमवर्गीय चिरडले जाऊ नयेत, अशी अाशा उद्धव यांनी व्यक्त केली आहे.

जवानांचे प्राण वाचवता येत नाहीत, बेइमान कोण?

सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतरही पाकिस्तानची दहशतवादी मस्ती कायम आहे.सर्जिकल स्ट्राइक नंतरही पन्नास जवान शहीद झाले. त्यानंतर सर्जिकल स्ट्राइकच्या तुताऱ्या फुंकणे बंद झाले असले तरी राजकीय सर्जिकल स्ट्राइकच्या पिपाण्या रोज नव्याने वाजविल्या जात आहेत. जर सीमेवरील जवानांचेच प्राण वाचविले जाऊ शकत नसतील तर बेइमान नक्की कोण? अशी विचारणाही उद्धव यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कानपिचक्या

> धनदांडग्यांनी विदेशात दडवलेला काळा पैसा आणण्यासाठी नोटाबंदीचा सर्जिकल स्ट्राइक केला. पण विदेशातून दमडाही परत आला नाही.

> नोटाबंदीनंतर एक तरी काळा पैसेवाला जेलात खडी फोडायला गेला काय?

> बेनामी प्रॉपर्टीचा कायदा झाल्यावर काय व्हायचे ते होईल. पण या निर्णयाची बोंब सुटताच सर्वत्र बेनामीवाल्यांनी त्यांच्या इस्टेटी चोवीस तासात ‘पवित्र’ करून घेतल्या असतील.

> कायद्याच्या पळवाटा व भगदाडे लक्ष्मीपुत्रांसाठीच ठेवली असून सामान्य जनतेला कायद्याच्या टाचेखाली चिरडण्याची सध्या रीतच बनली आहे.

> काश्मीर खोऱ्यातील हिंदू पंडितांच्या कायदेशीर इस्टेटी परत मिळवून देण्यासाठी सरकार एखादा सर्जिकल स्ट्राइक करणार काय?

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *