facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / नागपूर / एलईडी पथदिव्यांचे कंत्राट झोननिहाय

एलईडी पथदिव्यांचे कंत्राट झोननिहाय

वेळेत पथदिवे लावण्यात अपयशी ठरलेल्या जुन्या कंत्राटदाराला बाजूला सारत स्थायी समितीने झोननिहाय एलईडी पथ​दिवे लावण्याचा ठरावास मंजुरी प्रदान केली. मंगळवारला एकाच ​दिवशी स्थायी समितीच्या दोन बैठकी घेण्यात आल्या. यासोबतच यापूर्वी शहरातील जुने दिवे काढून एलईडी दिवे लावण्याचे कंत्राट दिलेल्या जे. के. सोल्युशनचा कंत्राट रद्द करण्यात आला.

महापालिकेने मे २०१४ मध्ये शहरात २७ हजार पथदिवे बदलण्याचा कंत्राट जे. के. सोल्युशन इंक या कंपनीला दिला होता. १८ महिन्यांत काम करण्याचा करार या कंपनीने केला होता. परंतु, सुरुवातीला केवळ ५३७ पथदिवे बदलून या कंपनीने हात वर केले. अनेकदा नोटीस देऊनही कंपनीने काम सुरू केले नाही. यामुळे विद्युत विभागाने या कंपनीचा कंत्राट रद्द करतानाच भरपाई घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. विशेष म्हणजे हा प्रकल्प राबविण्यात अपयशी ठरल्यानंतरही कंपनीने महापालिकेकडे १७ कोटींची मागणी केली. त्यामुळे महापालिकेनेही एलएडी लाइट्‌समुळे दीड वर्षात किती ऊर्जा बचत अपेक्षित होती, त्यातून महापालिकेची किती बचत अपेक्षित होती, वेळेत काम न केल्यामुळे इतर कंत्राटदाराकडून महापालिकेला कराव्या लागलेल्या कामाचा खर्च किती, असा हिशेब काढून महापालिकेनेही ही सर्व रक्कम या कंत्राटदाराकडून वसूल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. या सर्व वाटाघाटीत विलंब होईल. त्यामुळे स्थायी समितीने जे. के.चा कंत्राट रद्द केला. त्याचबरोबर दुसऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत तत्काळ झोनस्तरावर कंत्राटदार नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. जुन्या कंत्राटदाराला कंत्राट रद्द केल्याची सूचना करताच नव्या दहा कंत्राटदारांना झोनमधील पारंपरिक पथदिवे बदलून नवे एलईडी लाईट लावणे, जुने केबल बदलणे, जुने खांब बदलण्याबाबत कार्यादेश दिले जाणार आहे. ही सर्व कामे सात वर्षांत करावी लागणार आहे. परंतु, त्यापेक्षा कमी कालावधीत ही कामे होईल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

असे आहेत झोननिहाय कंत्राटदार
झोन १ : साधना इलेक्ट्रिक वर्क्स, नागपूर

झोन २ : निशांत इलेक्ट्रिकल्स, नागपूर

झोन ३ : सोनू इलेक्ट्रिकल्स, नागपूर

झोन ४ : दत्त इलेक्ट्रिकल्स, नागपूर

झोन ५ : लिंक एन्टरप्राईजेस, नागपूर

झोन ६ : राहुल कन्स्ट्रक्शन, नागपूर

झोन ७ : अनिल इलेक्ट्रिकल्स अॅण्ड

असोसिएट्स नागपूर

झोन ८ : बालाजी असोसिएट्स, नागपूर

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *