facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / गावच्या पाण्यावर शेतकऱ्यांची मालकी

गावच्या पाण्यावर शेतकऱ्यांची मालकी

‘गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून ते गावात जिरवावे. त्यावर मालकी फक्त गावातील शेतकऱ्यांची राहील,’ असे मत कृषीतज्ज्ञ हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी मांडले.
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शेती या विषयावर ‘आता उठवू सारे रान’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब, कृषीतज्ज्ञ भगवानराव कापसे यांनी भाग घेतला. या परिसंवादात बोलताना पोपटराव पवार यांनी जलसंवर्धन ही काळाची गरज असून शासनाच्या अभियानात ग्रामस्थांनी सहभाग घेऊन त्याला यशस्वी करण्याची गरज व्यक्त केली. अनेक आदर्श गावांत चांगले काम होऊनही ग्रामस्थांनी त्याकडे पाठ फिरवल्याने गाव बकाल झाले आहे. हिवरेबाजारात ग्रामस्थांनी वर्गणी करून मशीद बांधली हे आदर्श उदाहरण आहे. सरकारी अनुदानाची वाट न पाहता श्रमदान करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा अतिवापर टाळून बारमाही पिकांपेक्षा आठ महिन्यांचे पीक घ्यावे. सरकारने सर्व अनुदान बंद करून शेतकऱ्याला त्याच्या मालाचे हमीभाव मिळाल्यास शेतीला चांगले दिवस येतील, असे पवार म्हणाले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी ज्या कायद्यामुळे शेतकऱ्याला गळफास बसत आहे ते कायदे बदलण्याची गरज व्यक्त केली. सत्ताधारी व विपक्ष या दोन्ही पक्षांतील नेत्यांना खडे बोल सुनावत त्यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या नेत्याला श्रद्धांजली द्यायला वेळ नाही याबद्दल खंत व्यक्त केली.
ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी गटशेतीचे फायदे सांगितले. या कार्यक्रमात शेती उद्योगात क्रांती करणारे रवींद्र पाटील व हळद-अद्रक लागवडीचे अभिनव यंत्र तयार करून ते बांगलादेशमध्ये विकणारे इंद्रजीतसिंह यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. ज्योती स्वामी यांनी केले, तर आभार प्रा. काकासाहेब वराडे यांनी केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *