facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / पार्ट्या करा; पण दारू नको

पार्ट्या करा; पण दारू नको

दारूच्या घोटासह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी खास नियोजन केले आहे. थर्टी फर्स्ट हा मुहूर्त चुकायला नको, यासाठी आधीपासूनच तयारी करण्यात आली. अनेकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एक दिवसांचा परवाना मिळावा यासाठी अर्ज केले. मात्र, महामार्गांपासून ५०० मीटरच्या परिसरात मद्याचा वापर करता येणार नसल्याचे सांगत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या अर्जांना केराची टोपली दाखविली आहे.

देशभरातील रस्ते अपघात आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणा‍ऱ्यांच्या वाढत्या संख्येची गंभीर दखल घेत, त्याला कारणीभूत ठरणा‍ऱ्या सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूविक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. महामार्गांवर असलेल्या दारू दुकानांच्या परवान्यांचे ३१ मार्च २०१७ नंतर नुतनीकरण न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नवीन दुकांनांनाही पुरवानगी देण्यावर बंदी घालण्यात आली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडून एक दिवसाच्या परवान्यावरही रोख लावण्यात आली आहे. याचा फटका थर्टी फस्ट साजरा करणाऱ्यांना बसला आहे. गेल्या वर्षी थर्टी फस्टला महामार्गाच्या परिसरात २८ मोठ्या पार्ट्या झाल्या होत्या. या पार्ट्यांसाठी दारूचा एक दिवसाचा परवाना देण्यात आला होता. जिल्ह्यातील महत्त्वाची पार्ट्यांची ठिकाणे महामार्गांच्या परिसरात आहेत.

पार्ट्यांसाठी लक्ष्मणरेषा
रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांच्या परिसरातील ५०० मीटरपर्यंतच्या दारू दुकानांना बंदीचे आदेश दिले. महामार्गांवर दारूविक्रीच्या दुकानाची जाहिरात करणारी होर्डिंग्ज लावण्यास देखील न्यायालयाने मनाई केली आहे. महामार्गांवर बंधने असली तरी इतर परिसरात आयोजित पार्ट्यांमध्ये दारूसाठी एकदिवसाचा परवाना देण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शहरातील पार्ट्यांसाठी १५ हजार आणि ग्रामीणमध्ये १० हजार ५० रुपये शुल्क आकारले जाते.

आठ पथकांची नजर
नियमात राहूनच थर्टी फस्ट साजरा, करा अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८ पथके तयार केली आहेत. यातील ३ पथके केवळ शहरात निगरानी ठेवणार आहेत. मध्य प्रदेशातील स्वस्त दारू नागपुरात आणून ती ब्रॅन्डेड बॉटल्समध्ये भरून विकली जाते. वेगवेगळ्या राज्यांमधून कर चुकवून नागपुरात येणाऱ्या दारूवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *