facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / प्राप्तिकराकडून केडीसीसीची कोणत्याही क्षणी चौकशी?

प्राप्तिकराकडून केडीसीसीची कोणत्याही क्षणी चौकशी?

नोटाबंदीच्या कालावधीत जमा केलेल्या रकमांबाबतच्या तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाचे पथक कोणत्याही क्षणी जिल्हा बँकेत धडकण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागाने सोमवारी सांगली जिल्हा बँकेवर छापा टाकून तपासणी केली होती. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेची तपासणी होणार असल्याचे समजते. या कारवाईत बँकेतील खातेदार, भरण्यात आलेली रक्कम, कर्जवाटप, ठेवींची माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.

१० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत जमा झालेली व ८ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत जमा असलेली अशी तब्बल ३०४ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेत आहे. पन्नास हजार रुपयांपासून पुढील रक्कम ज्या खात्यांवर भरण्यात आली अशी ८२५ खाती नाबार्डने यापूर्वी तपासली आहेत. ​जिल्हा बँकेमध्ये ५० हजार रुपयांच्या आत पैसे भरलेल्या खात्यांची संख्या जास्त आहे. त्यापुढील रक्कम भरल्या गेलेल्या खात्यांवर लक्ष असेल.

नाबार्डबरोबर प्राप्तिकर व ईडी विभागाकडून याबाबत तपासणी होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. नियमित भरण्यात येणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भरण्यात आलेल्या खात्यांवर प्राप्तिकर विभागाचे जास्त लक्ष असेल. या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेचे स्त्रोत तपासले जाणार आहेत. संबंधित खातेधारकच तो त्या खात्यावरील व्यवहार करत आहे की कामचलवू खाते आहे याची तपासणी केली जाणार आहे.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *