facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / लोकल अपघात; चाकरमान्यांचे मेगा हाल

लोकल अपघात; चाकरमान्यांचे मेगा हाल

भल्या पहाटे कुर्ला-अंबरनाथचे पाच डब्बे घसरल्याने सीएसटी आणि कर्जतकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. त्यामुळं पुण्याकडं जाणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड, इंद्रायणी आणि कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले असून या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या दिवा मार्गे वळविण्यात आल्या आहेत . लोकल सेवाच पुर्णपणे ठप्प झाल्यानं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे आज पहाटे पहाटेच मेगा हाल झाले. दरम्यान खुप उशिरानं फक्त कल्याण ते सीएसटी रेल्वे धीम्यागतीनं सुरु करण्यात आली. त्यामुळं प्रचंड गर्दीत धक्केबुक्के खात चाकरमान्यांना प्रवास करावा लागला.

आज पहाटे ५.५३ वाजता हा भीषण अपघात झाला. कुर्ल्याहून अंबरनाथला ही लोकल जात होती. कल्याण सोडल्यानंतर ट्रॅक बदलत असताना या रेल्वेचे पाच डब्बे घसरले. त्यामुळे रेल्वे रुळालाही तडे गेले. लोकलचे डब्बे घसरुन विजेच्या काही खांबांना धडकल्यानं रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांब्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र कर्जतच्या दिशेनं जाणारी आणि कर्जतहून सीएसटीकडं येणारी वाहतूक संपुर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातामुळं लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतूक सेवेवरही परिणाम झाला असून पुण्याकडं जाणाऱ्या डेक्कन क्विन, इंटरसिटी,सिंहगड, कोल्हापूर-कोयना आणि पुणे-इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळविण्यात आल्या आहेत. ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या या अपघातामुळं चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अंबरनाथ ते कर्जत दरम्यान शटल सेवा सुरु करण्यात आली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून १३ जादा बसेस सोडल्या आहेत.


तपास सुरु

रेल्वे अपघात नक्की कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. विठ्ठलवाडीजवळ ट्रॅकला आधीच तडे गेले होते की अपघातानंतर तडे गेले हे तपासानंतरच कळेल असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के.जैन यांनी सांगितले. घसरलेले डबे हटवून रेल्वेसेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,’ असे जैन यांनी स्पष्ट केलं.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *