facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / साडेचौदा हजार घरात ‘उज्ज्वला’

साडेचौदा हजार घरात ‘उज्ज्वला’

आवाज नेव्ज नेटवर्क  –

अहमदनगर – पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील साडेचौदा हजार कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळाले आहे. या योजनेतून गॅस कनेक्शनसाठी मोठ्याप्रमाणावर मागणी असून, अनेक महिन्यांपासून अर्ज भरूनही अनेक कुटुंबांना कनेक्शन मिळालेले नाही. ही कुटुंबे गॅस कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रशासनाने केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत असलेल्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येते. गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी जिल्ह्यातील गॅस एजन्सींकडे अर्ज करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. कनेक्शन मिळविण्यासाठी भारत, हिंदुस्थान, इंडियन आइल या एजन्सींजकडे ७० हजार अर्ज आले होते. त्यातील आठ हजार अर्जात त्रुटी आढळल्याने ते अपात्र ठरविण्यात आले. त्यातील ५१ हजार ८३२ अर्ज या योजनेत गॅस कनेक्शनसाठी पात्र ठरविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात तीनही कंपन्यांनी प्रत्येकी दहा हजार प्रमाणे तीस हजारच गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यातही आतापर्यंत प्रत्यक्षात १४ हजार ७०५ जणांनाच गॅस कनेक्शन मिळू शकले. त्यात भारत गॅसने सर्वाधिक ६ हजार ३७३ जणांना, हिंदुस्थान पेट्रोलियमने ३ हजार ३७४ जणांना, तर इंडियन आइल कंपनीने ४ हजार ९५ जणांना गॅस कनेक्शन दिले आहे. अद्यापही ३५ हजार जणांना मोफत गॅस कनेक्शन मिळालेले नाही. गॅस कनेक्शन न मिळाल्याने अर्जदार गॅस एजन्सींकडे चौकशी करत आहेत.

Check Also

मतदारांना काय पाहिजे की आमच्या भागाचा विकास कोणी केला – मंगला कदम

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *