facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / अविष्कार ३ जानेवारी पासून रंगणार

अविष्कार ३ जानेवारी पासून रंगणार

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने मंगळवारी (दि. ३ जानेवारी) जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विद्यापीठ परिसर या चार ठिकाणी जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धेला प्रतिसाद मिळत आहे. चारही ठिकाणी एकूण ११३० प्रवेशिका प्राप्त झाल्या असून यात १९८७ विद्यार्थी सहभागी होत आहेत.

अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी सहा विषयनिहाय विभाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी आणि शिक्षक अशा चार गटात स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पोस्टर व मॉडेल या दोन्ही सादरीकरणात भाग घेता येईल. मंगळवार, (दि. ३ जानेवारी) रोजी विद्यापीठ प्रशाळेसाठी होणाऱ्या स्पर्धेसाठी उद््घाटन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कैलासचंद्र शर्मा यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून प्रा. व्ही. एल. माहेश्वरी काम पाहतील.

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्याची स्पर्धा जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जळगाव येथे सकाळी ९ ते ५ यावेळेत होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाभा अणुसंधान केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. गुलशन रेलर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा. पी. पी. माहुलीकर राहतील. प्रा. डी. जी. हुंडीवाले हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार (दि. ३) सकाळी साडेसात वाजता नेहरू पुतळा, रेल्वे स्टेशन रोड व मध्यवर्ती बसस्थानकाजवळ महात्मा गांधी उद्यान येथून बसची व्यवस्था विद्यापीठाच्या वतीने करण्यात आली आहे. येथील स्पर्धेसाठी ४३१ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून ८३३ विद्यार्थी सहभागी होतील. निरीक्षक म्हणून प्रा. आर. एल. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्याची स्पर्धा विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे होणार असून यात ३५१ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून ५६१ विद्यार्थी सहभागी होत आहेत. स्पर्धेचे उद््घाटन माजीमंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व महापालिका आयुक्त डॉ. संगीता धायगुडे प्रमुख पाहुणे म्हणून व संस्थेचे चेअरमन डॉ. दिलीप पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. येथे प्रा. जे. बी. साळी हे निरीक्षक राहतील.

नंदुरबार जिल्हा

जिल्ह्याची स्पर्धा जी. टी. पाटील कला, विज्ञान व वाणिज्य कॉलेज, नंदुरबार येथे होईल. या स्पर्धेसाठी १७३ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून २९१ विद्यार्थी सहभागी होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार तालुका विधायक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. प्राचार्य डॉ. व्ही. एस. श्रीवास्तव अध्यक्षस्थानी राहतील. या स्पर्धेसाठी डॉ. डी. एस. दलाल निरीक्षक आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *