facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / नॅशनल पार्कात बस उलटली, १० जण जखमी

नॅशनल पार्कात बस उलटली, १० जण जखमी

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, अर्थात नॅशनल पार्कमध्ये बस उलटून झालेल्या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहेत.

नॅशनल पार्कमध्ये भटकंतीसाठी आलेल्या ३१ पर्यटकांना घेऊन एक बस कान्हेरी गुंफांकडे चालली होती. त्यावेळी चढणीवर गिअर अडकल्यानं बस उलटल्याचं कळतं. वेग कमी असल्यानं मोठा अपघात टळला, परंतु १० ते १२ जणांना मार लागला आहे. त्यांच्यावर आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या अपघातात कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *