facebook
Sunday , January 22 2017
Breaking News
Home / Featured / पुण्यातील ‘सनबर्न’ला दणका, ६२ लाखांचा दंड

पुण्यातील ‘सनबर्न’ला दणका, ६२ लाखांचा दंड

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – पुण्यातील बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांना आज ६२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विनापरवाना डोंगराचं सपाटीकरण केल्यानं हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली.

पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला विविध स्तरांतून विरोध होत असतानाच, जागेसंबंधीच्या परवानग्या आणि करार करतानाही नियमांचं पालन न केल्यानं आयोजक गोत्यात आले आहेत. सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद येथील जागेचा करारनामा भाडेपट्टा म्हणून नोंदविण्याऐवजी भाडेकरार म्हणून नोंदविल्याबद्दल नोंदणी व मुद्रांक विभागाने संबंधित कंपनीला ४२ लाख रुपये भरण्याची नोटीस काल बजावली होती. त्यानंतर आज त्यांना प्रांताधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.

सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद गावातील डोंगराचं सपाटीकरण करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तलही झाली आहे. या सपाटीकरणासाठी तहसीलदार किंवा जिल्हा खनिकर्म विभागाची परवानगी आवश्यक होती. पण आयोजकांनी कुठलीच परवानगी घेतली नसल्यानं प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना दंड ठोठावला आहे.

दरम्यान, ‘सनबर्न’च्या आयोजकांकडून १ कोटी ७७ लाख रुपयांचा करमणूक कर सरकारने वसूल केला आहे.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *