facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / लोकल घसरणीवरून सेना प्रभूंवर ‘घसरली’!

लोकल घसरणीवरून सेना प्रभूंवर ‘घसरली’!

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – वारंवार होणारे अपघात, डबे घसरण्याच्या घटना पाहता, उपनगरीय रेल्वेचा सुधारण्याच्या तुताऱ्या म्हणजे गाजराची पुंगीच ठरल्या आहेत, अशी टिप्पणी करत शिवसेनेनं आज पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना लक्ष्य केलं आहे.

गुरुवारी विठ्ठलवाडी स्थानकाजवळ लोकलचे पाच डबे घसरल्यानं तब्बल ११ तास मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि चाकरमान्यांचे हाल झाले होते. त्यावरूनच शिवसेनेनं ‘सामना’मधून प्रभूंवर शरसंधान केलं आहे.

उपनगरी रेल्वे, त्यातील प्रचंड गर्दी, वारंवार विस्कळीत होणारी वाहतूक, त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल या मुंबईकरांसाठी अनपेक्षित घटना नाहीत. मध्य रेल्वेचा गोंधळ प्रवाशांच्या अंगवळणी पडला आहे. वास्तविक ज्या भागात गुरुवारी रुळावरून डबे घसरले त्या रेल्वे मार्गाची तपासणी २२ नोव्हेंबरला करण्यात आली होती. अल्ट्रासॉनिक पद्धतीने तपासणी करून रुळांना भेगा पडल्या आहेत का, तडे गेले आहेत का हे पाहिले जाते. तरीही गुरुवारचा अपघात घडला. उपनगरीय रेल्वे सेवा सुधारण्याच्या घोषणा कशा पोकळ आहेत, यावरच या ‘लोकल घसरणी’ने शिक्कामोर्तब केले आहे, अशी चपराक शिवसेनेनं लगावली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या ‘लाइफलाइन’चा, चाकरमान्यांना रोज सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेनं नोकरदारांना साद घातल्याचं चित्र आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *