facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘सनबर्न’च्या कंपनीला ४२ लाखांची नोटीस

‘सनबर्न’च्या कंपनीला ४२ लाखांची नोटीस

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद येथील जागेचा करारनामा भाडेपट्टा म्हणून नोंदविण्याऐवजी भाडेकरार म्हणून नोंदविल्याबद्दल नोंदणी व मुद्रांक विभागाने संबंधित कंपनीला ४२ लाख भरण्याची नोटीस बजावली आहे. हे शुल्क न भरल्यास दरमहा दोन टक्के दंडही आकारण्याचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे.

सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद येथील जागेचा पाच वर्षांसाठीचा करारनामा भाडेपट्टा म्हणून नोंदविणे आवश्‍यक असताना पर्सेप्ट लाइव्ह या कंपनीने तो भाडेकरार म्हणून नोंदविला आहे. हा दस्त नोंदविताना कंपनीने फक्त साडेबारा हजारचेच मुद्रांक शुल्क भरले आहे.

त्या पार्श्वभूमीवर, मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी कंपनीला ४२ लाख भरण्याची नोटीस बजावली आहे. सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद येथील जागेचा करारनामा भाडेपट्टा म्हणून नोंदविण्याऐवजी भाडेकरार म्हणून नोंदविल्याबद्दल नोंदणी व मुद्रांक विभागाने संबंधित कंपनीला ४२ लाख भरण्याची नोटीस बजावली आहे. हे शुल्क न भरल्यास दरमहा दोन टक्के दंडही आकारण्याचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *