facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / २५ लाख रुपयांची वसुली

२५ लाख रुपयांची वसुली

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – जिल्ह्यात दुष्काळी अनुदान वाटपात सहा तालुक्यांमध्ये ६५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळले आहे. दुसऱ्यांच्या बँक खात्यात गेलेल्या रकमेपैकी सुमारे २५ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली. खात्यात जास्तीचे पैसे भरण्यात आलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून. त्याचबरोबर काही प्रकरणांत बँक खाते गोठवून रकमेची वसुली करण्यात आली आहे.
फुलंब्री, गंगापूर, पैठण तालुक्यांत दुष्काळी अनुदान वाटपात गैरप्रकार करण्यात आला. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिक रक्कम, तर काही शेतकऱ्यांना दमडीही मिळाली नसल्याचा प्रकार उघड झाला होता. या गैरप्रकारात महसूल विभाग, बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पालकमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली होती. यानुसार जिल्ह्यात दुष्काळी अनुदान वाटपात झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून आठ दिवसांत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते, मात्र आठ दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाला दोषी सापडले नाहीत.
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांना विचारले असता ते म्हणाले की, चौकशी सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील ९पैकी ६ तालुक्यांमधील खात्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. यामध्ये ६५ लाख रुपयांची अनियमितता आढळली. यापैकी सुमारे ३० ते ३५ टक्के रक्कम वसूलही करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात उर्वरित तीन तालुक्यांमध्ये अनुदान वाटपात झालेल्या चुका व जाणिवपूर्वक झालेल्या घोळाची संपूर्ण अहवाल तयार करण्यात येणार अाहे. या प्रकरणात चुका केलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. अनुदान वाटपात गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही गावंडे यांनी सांगितले.

पाच हजारांवर प्रकरणे

जमीन नसताना अनुदान मिळणे, कोरडवाहू जमिनीवर फळबागांचे अनुदान, काहींच्या खात्यावर एकापेक्षा अधिक वेळेस अनुदान देणे अशी सुमारे चार ते पाच हजार प्रकरणे उघडकीस आली आहेत. जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये खरेदीदाराचे नाव सातबाऱ्यावर न लागल्यामुळे जुन्याच शेतमालकाच्या नावावर अनुदान गेल्याचे प्रकार घडल्याचे प्रकरण आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *