facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / नाते जुळले मनाशी मनाचे!

नाते जुळले मनाशी मनाचे!

आवाज न्यूज नेटवर्क –

ठाणे – मनोरुग्णाकडे दुर्लक्ष करत त्यांना कायमचे मनोरुग्णालयाच्या चौकटीत बंद करणाऱ्या कुटुंबियांची अनेक उदाहरणे दिसत असताना, याच पार्श्वभूमीवर कोणतेही नाते नसताना केवळ सामाजिक कार्याची आस आणि समोरील रुग्णाबद्दल वाटणारी आपुलकी यांआधारे सामाजिक कार्यकर्त्या महिलेने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णात एक बंध तयार झाला आहे. त्यामुळे कोणत्याही नात्यांविनाही या महिलेने मनोरुग्ण महिलेला उपचारांनंतर थेट आपल्या घराचा आसरा दिला आहे.

त्या दोघींमध्ये ना कोणते नाते, ना त्यांच्यात सामाजिक अथवा आर्थिक व्यवहार. दोघींची जन्मगावे वेगवेगळी, कार्यक्षेत्र भिन्न, ठाण्यात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मनिषा जाधव (नाव बदलले आहे) यांना दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ महिला भरकटलेल्या दिसल्या. त्यांच्या वागणुकीवरून त्यांना मानसिक अवस्था ढासळल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोर्टाची कायदेशीर कारवाई पूर्ण करत महिला रुग्णाला ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करतानाही रुग्णाची कोणतीही पार्श्वभूमी अथवा कुटुंबाची माहिती नसल्याने मनिषा यांनीच रुग्णाचे पालकत्व स्वीकारले. कोर्टाच्या नियमानुसार रुग्णालयात भरती करणाऱ्या व्यक्तीला सर्वाधिकार देण्यात येत असल्याने त्यांनी कारवाई पूर्ण करत उपचारांची मागणी केली. दोन वर्षांत त्यांच्यावर झालेले उपचार, समुपदेशन यांतून त्यांची स्थिती सुधारली. या कालावधीत मनिषा वारंवार रुग्णालयाच्या संपर्कात होत्या. उपचारांसाठी लागणी औषधे आणून देण्यापासून त्यांच्या प्रकृतीची वेळोवेळी माहिती घेण्यापर्यंत सर्व काही मनिषा यांनी केले. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांनी दोन वर्षे खटपट केली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्याचे ठरले, मात्र कुटुंबियांबाबत पुरेशी नसणारी माहिती, त्यांच्या वयोमानामुळे पुसट झालेल्या आठवणी यांमुळे त्यांना महिला आश्रमात पाठविण्याचे ठरत होते. त्यावेळी रुग्णालयातील मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा वाठोरे यांनी मनिषा यांच्याशी संवाद साधत त्यांना रुग्णाच्या पुढील सोयींची माहिती दिली. मात्र आश्रमात जाण्यास नकार देत महिला रुग्णाने मनिषा यांच्याच घरी जाण्याचा हट्ट धरला.

अन् नाते दृढ झाले

रुग्णालयात दाखल केल्यापासून मनिषा आणि त्यांच्यात जडलेले नाते संपविण्यास त्या तयार नसल्याने त्यांनी मनिषा यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. सुरुवातीला मनिषा यांनी ही विनंती मान्य केली नाही. कुटुंबातील इतर सदस्य, त्यांचे विचार आणि अनोळखी महिलेस घरी नेण्याबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्या. यावेळी सुरेखा वाठोरे यांनी समुपदेशन करून त्यांच्या शंकांची उत्तरे शोधली आणि मनिषा यांनी या महिलेस घरी घेऊन त्यांचा सांभाळ करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील कायदेशीर कारवाई पूर्ण करत अखेर अनोळखी असूनही मनाने जोडलेल्या या दोघी एकत्र नांदू लागल्या आहेत. ही घटना आमच्यासाठीही अविस्मरणीय असून अधीक्षक डॉ. दिनकर रावखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांच्या पुर्नवसनाचे काम सुरू असल्याचे वाठेरे यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *