facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / मोदींना जनतेचे आणखी किती बळी हवेत?-सेना

मोदींना जनतेचे आणखी किती बळी हवेत?-सेना

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – नोटाबंदीच्या विषयावरून पहिल्या दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेनं ‘थर्टीफर्स्ट नाईट’च्या ‘आभार प्रदर्शना’च्या भाषणावरूनही त्यांच्यावर शरसंधान केलं आहे.

पंतप्रधान मोदी हे आभाराचे भाषण हसतमुखाने करीत असताना बाराबंकी येथील बडागावात राहणार्याच छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. छोटूलाल हा जिवंतपणीच मेला व चारशेच्या वर लोक प्रत्यक्ष बँकांच्या रांगेत मरण पावले. त्यामुळे पंतप्रधानांनी ज्या नवीन घोषणांचा पाऊस पाडला तो अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो, अशी खरमरीत टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे.

नोटाबंदीनंतर किती काळा पैसा वसूल झाला याचा आकडाही पंतप्रधानांकडे नाही. मग लोकांचे इतके निर्घृण हाल का केले ते सांगावे व नव्या वर्षात तुम्हाला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवेत ते जाहीर करावे, असा हल्लाही त्यांनी मोदींवर चढवला आहे. माय मरो पण नोटाबंदी राहो, असेच हे धोरण असल्याची चपराकही शिवसेनेनं लगावली आहे.

>> मोदी हे भाषणात घोषणा करतात की धमक्या देतात अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. अर्थात मोदी यांच्या भाषणात तसे भीतीचे व चिंतेचे काहीच नव्हते. मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा भार हलका केला. आता फेब्रुवारी महिन्यात सादर होणार्या् केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री नवे काय करणार हा प्रश्नेच आहे.

>> ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य जनतेचे, मोलमजुरी करून जगणार्यां चे कंबरडे मोडले. लोकांच्या यातनांवर मोदी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फुंकर घालतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी फार गांभीर्याने भाषण केल्याचे दिसले नाही. जे रांगेत मेले व जे आजही तडफडत आहेत त्यांचे आभार मानून मोदी यांनी नव्या घोषणांची छत्री हलवली आहे.

>> बाराबंकी येथील बडागावात राहणार्याह छोटूलालचे बँकेत थोडेफार पैसे होते. आईच्या उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून तो दोन दिवस बँकेच्या रांगेत उभा राहिला. उपचारांसाठी सोडाच, पण अंत्यसंस्कारासाठीही बँकेतून दोनेक हजार रुपये मिळू शकले नाहीत. शेवटी घरातील गहू विकून त्याने आईवर अंत्यसंस्कार केले. असे लाखो छोटूलाल आज सरकारला शाप देत आहेत. त्यांच्यावर आभार प्रदर्शनाची शब्दसुमने उधळून काय होणार?

>> पंतप्रधानांनी ज्या घोषणांची आतषबाजी केली त्यापैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत. ढोकळा जुनाच आहे, तो नव्याने गरम करून वाढलाय किंवा ढोकळा जुनाच, पण चटणी नवीन किंवा शिल्लक कांदाभजी नव्याने तळून ‘गरम’ म्हणून विकणे अशातला हा प्रकार आहे. मात्र असे शिळे, तळकट, तुपकट खाणे हे आरोग्यास शेवटी हानीकारकच ठरते.

>> जिल्हा बँकांना केंद्राचे आधीचेच येणे बाकी असताना त्यांना नवीन बोजा सहन करावा लागणार आहे. तो पेलण्याची जिल्हा सहकारी बँकांची कुवत आज तरी नाही. त्यामुळे या बँकांची आर्थिक स्थिती अधिकच नाजूक होईल आणि त्याचा अंतिम फटका सामान्य शेतकर्या लाच बसू शकेल.

>> मुळात लोकांना मोदी यांच्याकडून वेगळ्याच अपेक्षा होत्या. ‘नोटाबंदी’मुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला दिलासा कधी मिळेल याचे ठाम उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही. कारण त्यांच्याकडे बहुधा उत्तरच नसावे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *