facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / अॅपमार्फत करा, नागपूर स्वच्छ

अॅपमार्फत करा, नागपूर स्वच्छ

मोबाइल अॅप डाऊनलोड करा आणि नागपूर शहराला देशातील सर्वांत स्वछ शहरांच्या पहिल्या दहामध्ये मानांकन मिळवून द्या, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्राध्यापक व विद्यार्थ्यांना केले आहे. परंतु, ते स्वच्छता अॅप नेमके काय आहे, ते कशासाठी वापरायचे, त्याबाबत काहीही नमूद केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थीही संभ्रमात पडले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत नागपूर शहराला पहिल्या दहामध्ये मानांकन मिळवून देण्यासाठी महापालिकेने जोरकस तयारी केली आहे. त्यामुळेच शैक्षणिक व सामाजिक संस्थांनाही त्यात सहभागी करून घेण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने स्वच्छता अॅप तयार केले आहे. त्या अॅपमध्ये नागरिकांना शहरातील कचरा, पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था आणि इतर नागरी समस्यांबाबत माहिती सादर करता येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या शहरातील अस्वछतेची तक्रार फोटोसह सादर केल्यानंतर ती थेट संबंधित महापालिकेच्या आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होणार आहे. त्या तक्रारीवर महापालिकेने काम करावे असे अपेक्षित असल्याचे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, नागपूर विद्यापीठाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना त्या अपॅबाबत कोणतीही माहिती पत्रात दिलेली नाही. केवळ चार ते सात जानेवारी या कालावधीत शहरात स्वछता सर्वेक्षण होणार आहे. त्यात देशभरातील ५०० शहरांची पाहणी होणार आहे. त्या पाहणीनंतर मापदंडानुसार मानांकन दिले जाणार असून, नागपूर शहराला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विद्यापीठ, कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वच्छ अॅप डाऊनलोड करावे, इतकेच अवाहनात नमूद केले आहे. केंद्र सरकारच्या इतक्या महत्त्वपूर्ण अभियानाची इतकी जुजबी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या अभियानात विद्यार्थी व शिक्षक किती गांभीर्याने सहभागी होतील, ते या पत्रावरून दिसून येते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *