facebook
Monday , February 20 2017
Breaking News
Home / Featured / एसी लोकलसाठी ‘परे’ची तयारी

एसी लोकलसाठी ‘परे’ची तयारी

मुंबईत लोकल मार्गावर प्रतीक्षा असलेली एसी लोकल चालविण्यासाठी पश्चिम रेल्वेने तयारी दर्शवली आहे. एसी लोकलची ही घंटा एकमेकांच्या गळ्यात अडकवण्यासाठी सुरू असलेली चढाओढ त्यातून संपुष्टात येईल, असे मानले जात आहे. ही सेवा चालविण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने सर्वेक्षण केले असून काही बदल केल्यास ही सेवा चर्चगेटपर्यंत चालवता येईल, अशी सकारात्मक भूमिका मांडण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून एसी लोकल चालविण्याविषयी चर्चा सुरू आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेल्या या लोकलच्या चाचण्या सुरू आहेत. मधल्या काळात ही सेवा पश्चिम रेल्वेने चालवावी, असे पत्र मध्य रेल्वेने दिले होते. त्यानुसार, पश्चिम रेल्वेने मार्गाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला आहे. त्यात, मार्गांसह अन्य काही बदल केल्यास ही सेवा चर्चगेटपर्यंत चालवता येण्याबाबत अहवाल मांडण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेनेत्यासंदर्भात मुख्यालयास लेखी पत्र दिल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून त्यास मंजुरी मिळणे आवश्यक आहे. बोर्डाकडून परवानगी मिळताच ही लोकल पश्चिम रेल्वेवर धावू शकेल.

सर्वप्रथम ही लोकल पश्चिम रेल्वेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्यात काही चक्रे फिरल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला. पण मध्य रेल्वेवरदेखील विविध तांत्रिक अडचणी असल्याचे लक्षात आल्याने ही लोकल पश्चिम रेल्वेने चालविण्याची भूमिका मांडण्यात आली.

पश्चिम रेल्वेवरील अडचणी दूर होतील!

पश्चिम रेल्वेवर माहीम, माटुंगा, महालक्ष्मी येथे एसी लोकलच्या उंचीची समस्या जाणवत होती. त्यातील माहीम, माटुंगा येथील दोन्ही पुलांचा अडसर जाणवत होता. पण, हे दोन्ही पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याने अडचण येणार नसल्याचे समजते. महालक्ष्मी येथे रुळांची उंची कमी- जास्त वा ओव्हरहेड वायर वर-खाली केल्यास ही सेवा चालवणे शक्य असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी नमूद केले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *