facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / ‘गडकरींचा पुतळा हटवणारे महाराष्ट्राचे वैरी!’

‘गडकरींचा पुतळा हटवणारे महाराष्ट्राचे वैरी!’

ज्या पापी औरंग्याने संभाजीराजांना हालहाल करून मारले त्या औरंग्याची कबर तीर्थस्थळ बनले आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्याचा मारेकरी अफझलखान शांतपणे पहुडला आहे. त्यांचा बालही बाका करू न शकणारे लोक रात्रीच्या अंधारात महाराष्ट्राच्या प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. हे कृत्य करणारे लोक शिवविचारांचे दुश्मन व महाराष्ट्राचे वैरी आहेत, अशा खरमरीत शब्दांत शिवसेनेनं राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणाऱ्यांवर हल्ला चढवला आहे.

गडकरी यांच्या पुतळ्यावरील हल्ला हा जातीय विद्वेषाचा फूत्कार आहे व यामागे सरळ पालिका निवडणुकांचे जातीय राजकारण दिसते, अशी चपराक लगावतानाच, या प्रकारामुळे महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ‘एकच प्याला’त गटांगळ्या खात असल्याचंच सिद्ध झालं असल्याची टिप्पणी करत सेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं आहे. तसंच, औरंग्याच्या कबरीला सरकारी बंदोबस्त आहे आणि अफझलखानाचे राजकीय, धार्मिक उदात्तीकरण सरकारी खर्चाने चालले आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *