facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / चौक करणार वाहतुकीचे चित्रमय मार्गदर्शन

चौक करणार वाहतुकीचे चित्रमय मार्गदर्शन

नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, त्याबाबत सजग राहावे यासाठी अनेकविध उपाय-उपक्रम केले जातात. याच मालिकेत मनपाने नवा उपक्रम हाती घेतला आहे. स्वयंचलित सिग्नलसोबतच चौकात वाहनचालकांनी कोणते नियम पाळावेत, हे सांगणारे आकर्षक दिशादर्शक शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर तयार होणार आहेत सिव्हिल लाइन्स येथील राजाराणी चौकात या संकल्पनेचे पहिले ‘मॉडेल’ तयार झाले आहे. शहरातील चौकांत सुरक्षित वाहतूक संचालनासाठी झेब्रा क्रॉ​सिंग, स्टॉपलाइन आणि थर्मोप्लास्टिक पेंटिंगचे पट्टे मारले जाणार आहेत. आज, ४ जानेवारीच्या स्थायी समितीच्या विशेष सभेत यासंदर्भातील दोन ठराव मंजुरीसाठी येणार आहेत.

मनपाने संपूर्ण शहरातील वाहतून पोलिसांच्या झोनअंतर्गत येणाऱ्या चौकात ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. यात अगदी चौकात वाहतुकीचे धडे मिळतील अशी व्यवस्था असेल. दुचाकीचालकांसाठीची स्टॉपलाइन अगदी २०० मीटर दूर अंतरावरून दिसेल. ती दिसताच दुचाकीचालकाने त्याच्या वाहनाची गती कमी करावी, अशी अपेक्षा आहे. पादचाऱ्यांसाठी अतिरुंद असे पांढरे लाल रंगाचे झेब्रा क्रॉसिंग असेल. सोबतच सायकलचालकांना उभे राहण्याची जागा व रस्ता ओलांडण्यासाठीची मार्किंगही असेल. शहरातील रस्ते चकाचक होत आहे. काही ठिकाणी डांबरीकरण झाले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जाळे पसरत आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते सुधारण्यासोबतच वाहतुकीबाबत नागपूरकरांमध्ये जागरूकता आणण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात येत आहे.

दक्षिण व पश्चिम झोन अंतर्गत येणाऱ्या चौकांच्या कामासाठी कॅटेलाइन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यांनी ३२ लाख ५२ हजार २९१ रुपयांची १९.९० टक्के कमी दराची निविदा सादर केली आहे. या कामाकरिता प्रतिचौरस मीटर ४७७.६८ रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. यासोबतच उत्तर, इंदोरा, एमआयडीसी व पूर्व झोनअंतर्गत येणाऱ्या चौकात ही व्यवस्था करण्यासाठीही याच कंपनीच्या निविदेला मंजुरीचा ठराव आहे.

आतापर्यंत शहरातील चौकात पांढरे व पिवळे पट्टे मारले गेले होते. बरेचसे दिसेनासे झालेले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण शहरातील चौकातच वाहतुकीचे मार्गदर्शन करणारी व्यवस्था झाल्यास पोलिसांनाही कारवाई करताना अडचणीचे जाणार नाही. शिवाय, सायकलस्वार, दुचाकीस्वार आणि पादचारी त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळेल, असे मनपाचे म्हणणे आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *