facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / बीएसएनएल अधिकाऱ्याला पकडले

बीएसएनएल अधिकाऱ्याला पकडले

कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या बीएसएनएल विभागातील कमलेश वैकर या उपविभागीय अभियंत्याला मंगळवारी सीबीआयने पकडले. त्याची रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती. त्याच्या घरातही रात्री उशीरापर्यंत झडती सुरू होती.

बीएसएनएल विभागात विविध कामांचे कंत्राट देण्यात येते. त्यानुसार केबल टाकण्याच्या कामाचे कंत्राट एका कंपनीला मिळाले होते. कंपनीने पूर्ण केलेल्या कामाचे बिल हे बीएसएनएल विभागाकडे सादर केले होते. संबंधित बिल मंजूर करण्यासाठी वैकर याने एक लाख रुपयांची मागणी केली होती. या रक्कमेचा पहिला हप्ता दहा हजार रुपये देण्यासाठी कंत्राट घेतलेल्या कंपनीचे कर्मचारी आले होते. त्यानंतर ही रक्कम घेण्यासाठी वैकर ठरलेल्या ठिकाणी आला. त्यावेळी रक्कम स्वीकारत असताना सीबीआयच्या पथकाने संबंधित त्याला पकडले.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याला बुधवारी न्यायालयामध्ये हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *