facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / जळगाव / बोदवड सिंचन योजनेसाठी २,१७८ कोटी

बोदवड सिंचन योजनेसाठी २,१७८ कोटी

खान्देशातील जळगाव आणि त्या शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातील ५३ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जळगावच्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या २ हजार १७८ कोटी ६७ लाख रु.च्या खर्चास मान्यता देण्यात आली.

बोदवड परिसर उपसा सिंचन योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या ६५० कोटीच्या टप्प्यामुळे जळगावमधील ८ हजार ५५९ हेक्टर आणि बुलढाणा जिल्ह्यातील ६ हजार ४३५ हेक्टर अशा एकूण १४ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच एक हजार ५२८ कोटी ६७ लाख रु.च्या दुसऱ्या टप्प्यामुळे जळगावमधील २५ हजार ११० आणि बुलढाण्यामधील १३ हजार ३४५ हेक्टर अशा एकूण ३८ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम पुढील सात वर्षात पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटींचे अर्थसहाय्य मिळणार असून, त्यापैकी ६६.६६ कोटी निधी राज्य सरकारला प्राप्त झाला आहे.

या योजनेचा लाभ जळगाव जिल्ह्यातील अनियमित पाऊस असणारे बोदवड, जामनेर व मुक्ताईनगर तालुके आणि बुलडाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष असणाऱ्या मोताळा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *