facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / मुंबई / वसतिगृहांसाठीचा दोन कोटींचा निधी पडून

वसतिगृहांसाठीचा दोन कोटींचा निधी पडून

मुंबई विद्यापीठात चार वसतिगृहे उभारण्यासाठी केंद्राच्या समाजकल्याण विभागाकडून आलेला तब्बल एक कोटी ८० लाखांचा निधी गेल्या वर्षभरापासून पडून आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या हस्ते वसतिगृहाच्या बांधकामांचे उद्घाटनही करण्यात आले आहे. मात्र अद्याप बांधकाम सुरू झाले नसल्याचे उघडकीस आले आहे.

विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये दोन आणि ठाणे कॅम्पसमध्ये दोन अशी २०० विद्यार्थी क्षमतेची चार वसतिगृहे होणार आहेत. मात्र अद्याप या वसतिगृहांचे बांधकाम सुरूच झालेले नाही. विद्यापीठात शिकण्यासाठी ग्रामीण भागातूनही शेकडो विद्यार्थी येत असतात. मात्र मुंबईसारख्या महागड्या शहरात त्यांच्या राहण्याची सोय होत नाही. भाड्याने घर घेऊन राहणेही शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी वसतिगृहे सुरू करण्याची मागणी केली होती.

विद्यापीठात प्रस्तावित चार वसतिगृहांसाठी निधी आला आहे. मात्र वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक असणारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ संबंधित कंत्राटदाराला मिळालेले नाही. तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम सुरू झाले नाही. लवकरच या चारही वसतिगृहांचे बांधकाम सुरू होईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी दिली.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *