facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / जळगाव / ३४ नगरसेवकांना आजपासून नोटिसा

३४ नगरसेवकांना आजपासून नोटिसा

जळगाव नगरपालिकेतील विविध घोटाळ्यांप्रकरणी तत्कालीन नगरसेवकांना दोषी धरून त्यांच्याकडून वसुलीच्या नोटिसांबाबत नगरसेवकांची याचिका फेटाळली आहे. या ५४ नगरसेवकांमध्ये सात विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आता वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. आज, बुधवारपासून यातील ३४ जणांना वसुलीच्या नोटिसा तर वीसजणांना स्मरणपत्र देणार येणार आहे.

जळगाव नगरपालिकेत घरकुल, मोफत बससेवा या दोन्ही योजनेत घोटाळे झाल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल आहेत. याप्रकरणी राज्य सरकारच्या आदेशानुसार जोशी आणि सोनी समितीकडून चौकशी करण्यात आली होती. या दोन्ही चौकशी अहवालांमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक अशा ५४ जणांना घोटाळ्यांबाबत दोषी ठरवून त्यांच्याकडून घरकुल घोटळ्याप्रकरणी प्रत्येकी १ कोटी १६ लाख रुपये असे एकूण ६० कोटी ३२ लाख रुपये तर मोफत बससेवाप्रकरणी ५ लाख १४ हजार रुपये वसूल करण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार मनपाचे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये प्रत्येकी १ कोटी १६ लाख रुपये वसुलीच्या नोटिसाही या नगरसेवकांना बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर नगरसेवकांनी याविरोधात याचिका दाखल केली असता याला स्थगिती मिळाली होती. दरम्यान, ही याचिका न्यायालयाने फेटाळल्याने आता महापालिका आयुक्तांनी पुन्हा वसुलीच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *