facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / कन्नड पोलिस ठाणे, निवास्थानाचे भूमिपूजन

कन्नड पोलिस ठाणे, निवास्थानाचे भूमिपूजन

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – शहरातील पोलिस ग्राउंड मैदानावर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस ठाण्याची इमारत, ४ पोलिस अधिकारी व ३६ पोलिस कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
सुमारे पाच कोटी ७३ लाख रुपयांच्या या कामाला लगेच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पूर्व) कनिष्ठ अभियंता एस. डी. शिंदे, उपअभियंता मुर्तुजा अहमद, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे व मारुती पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. या कामाला २० डिसेंबर २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. शहर पोलिस ठाण्याची इमारत शंभर वर्ष जुनी असून ग्रामीण पोलिस ठाणे व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. चाळीसगाव रोडवरील पिशोर नाक्यासमोर पोलिस ग्राउंड मैदानावर या इमारती बांधण्यात येणार आहेत. टाइप २ मध्ये ३६ पोलिस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान व टाइप ३ मध्ये पोलिस अधिकारी यांच्यासाठी ४ निवासस्थानाचा समावेश आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *