facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / ‘कोल्हापूर चेंबर’मध्ये सत्तारुढांचीच बाजी

‘कोल्हापूर चेंबर’मध्ये सत्तारुढांचीच बाजी

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – औद्योगिक संघटनांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या त्रैवार्षिक निवडणुकीत आज, विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवत सत्ताधारी गटाने बाजी मारली. संस्थेच्या एकूण २३ जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे उर्वरीत २० जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यासाठी २८ उमेदवार रिंगणात होते.

बुधवारी एकाच दिवशी मतदान आणि मतमोजणी झाली. त्यात विरोधी गटाचा एकही उमेदवार विजयाच्या जवळही पोहोचू शकला नाही. त्यामुळे सत्ताधारी गटावर आरोप करणाऱ्या विरोधकांचा बार फुसका ठरला. विजयानंतर सत्तारूढ गटाच्या विजयी सदस्यांनी आतषबाजी करत आणि हलगीच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला.

पहिल्यांदाच झालेली ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माघारीच्या दिवशी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. पण, २७ डिसेंबर रोजी माघारीच्या दिवशी समझोता न झाल्याने अखेर निवडणूक लागली होती. विद्यमान अध्यक्ष आनंद माने यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाच्या विरोधात पारस ओसवाल यांच्या नेतृत्वाखालील गटाने आव्हान उभे केले होते. सत्तारूढ आघाडीचे कामकाज व्यापाऱ्यांसाठी नाही.राज्य कॅशलेस, पेपरलेस होत असताना चेंबरच्या कार्यालयात कम्प्युटर नाही. गेल्या सहा वर्षांत कोणतीही बैठक झालेली नाही, असे आरोप विरोधकांनी केल्याने निवडणुकीविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

विरोधकांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ४२३ सभासदांच्या संस्थेतील सत्तेसाठी बुधवारी चुरशीने ९३ टक्के मतदान झाले. त्यात सभासदांनी सत्ताधारी गटावरच पुन्हा विश्वास टाकून विरोधकांना चीत केले.

सभासदांनी पुन्हा आमच्यावर विश्वास टाकल्याने त्यांचे आभार मानतो. कोल्हापुरातील औद्योगिक आणि व्यावसायिक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. सभासदांचा विश्वास असाच सार्थ ठरवू.

– आनंद माने, सत्तारुढ पॅनेलचे नेते

Check Also

मतदारांना काय पाहिजे की आमच्या भागाचा विकास कोणी केला – मंगला कदम

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *