facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / जिल्हा बँकेच्या शाखेत काँग्रेसचे आंदोलन

जिल्हा बँकेच्या शाखेत काँग्रेसचे आंदोलन

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा रोखीने व त्वरित मिळावा, या मागणीसाठी काँग्रेसकडून बुधवारी (दि. ४) येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला.

पाचोरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने वाहतुकीचा काहीकाळ खोळंबा झाला होता. बुधवारी, करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विभागीय उपव्यवस्थापक दिलीप झोपे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. अभय पाटील, शहराध्यक्ष मुक्तार शहा, अॅड. अविनाश भालेराव, शेख इस्माईल शेख फकिरा, अनिल पाटील, साहेबराव पाटील आदी सहभागी झाले होते.

हक्काचा पैसा तातडीने मिळावा

जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे खाते असून शेतीशी निगडित कृषी कर्ज, कृषी विम्याचे हप्ते भरणे, शेतमालाची रक्कम काढणे व भरणे असे व्यवहार जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच होत असतात. सध्याच्या काळात कापूस, मका या पिकांच्या विक्रीतून मिळालेले धनादेश वटवण्यासाठी जिल्हा बँकेत जमा करण्यात आले आहे. उसनवारी घेतलेले देणे तसेच शेत मजुरांना मंजुरी द्यावयाची असल्याने या रक्कमेची शेतकऱ्यांना अत्यंत नितांत गरज आहे. त्यामुळे दिवसभराची कामे सोडून तो जिल्हा बँकेत रांगेत उभा राहत आहे. एवढे करूनही त्याला त्याचा हक्काचा पैसा मिळत नसून हताश होऊन माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्याला आपला हक्काचा पैसा रोखीने व ताबडतोब मिळावा या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. आंदोलनामुळे मोठा पोलिसांचा ताफा होता.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *