facebook
Monday , February 20 2017
Breaking News
Home / Featured / टेंभापुरी धरणग्रस्तांचा आयुक्तालयावर मोर्चा

टेंभापुरी धरणग्रस्तांचा आयुक्तालयावर मोर्चा

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद गंगापूर – भेंडाळा येथील शेती महामंडळाच्या जमिनीतून टेंभापुरी धरणग्रस्तांना जमिनी त्वरित वाटप करण्यात याव्यात यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार गंगापूर-भेंडाळा क्षेत्रातील जमीन टेंभापुरी प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना त्वरित करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. पण त्याबाबत प्रशासनाने दखल घेतली नाही. धरणग्रस्त खातेदारांना पर्यायी जमीन धरणग्रस्त भूमिहीन, शेतमजूर, छोटे व्यावसायिक व माजी सैनिकांना सरकारी नियमानुसार देय जमीन गंगापूर-भेंडाळा क्षेत्रातील शेती महामंडळाच्या जमिनीतून देण्यात याव्यात, उर्वरित लाभधारकांना भूखंड द्यावे, नियमित करावे, सर्व धरणग्रस्तांना दारिद्र्यरेषेखालील कार्ड, इंदिरा आवास योजनेनुसार अनुदान, शौचालय बांधणी अनुदान आदी लाभ द्यावेत आदी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने मागण्यांच्या पूर्ततेसाठी डॉ. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलवावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुभेदार मेजर सुखदेव बन यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आणि निवेदन देण्यात आले. त्यावर बन यांच्यासह साहेबराव साबळे, राम बाहेती, प्रभाकर साबळे, सईद पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *