facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / पैठणच्या विकासाला प्राधान्य असेल

पैठणच्या विकासाला प्राधान्य असेल

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – नवनिर्वाचित नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी बुधवारी पदाची सूत्रे स्वीकारली. शहरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वेतन या समस्या सोडवणे व शहराचा सर्वांगिण विकास याला प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील सर्वात तरूण नगराध्यक्ष ठरण्याचा मान भाजपचे सूरज लोळगे यांनी मिळवला आहे. नगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, उपजिल्हाध्यक्ष लक्ष्मण औटे, डॉ. सुनील शिंदे, माजी आमदार भाऊ थोरात, माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष विजय चाटुपळे, राजेंद्र लोळगे, सुनील रासने, रघुनाथ आगलावे, महेश जोशी, रमेश पाठक, गणी बागवान, शाम पंजवानी, शिवाजी तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष लोळगे म्हणाले, पैठण शहर हे ऐतिहासिक असून स्थानिक नागरिक, वारकरी व पर्यटकांना नगरपालिकेतर्फे सुविधा पुरवण्यावर लक्ष राहणार आहे. पक्षीय मतभेद बाजुला ठेऊन सर्वांना सोबत घेऊन नगराध्यक्षपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात पैठणनगरीचा कायापालट करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना भाजप तालुकाध्यक्ष शिसोदे म्हणाले, शहराचा विकास कसा असतो हे स्थानिक नागरिकांना भाजपच्या माध्यमातून समजणार आहे. विकास योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला नगरसेवक कल्याण भुकेले, सविता माने, आशा आंधळे, अलकाबाई परदेशी, बजरंग लिंबोरे, शोभा लोळगे, हसनोद्दिन कट्यारे, अजित पगारे, नुजहत टेकडी, ज्ञानेश घोडके, महेमुदा शेख, मैमुना बागवान, आबासाहेब बरकसे, सुचित्रा जोशी, पुष्पा वानोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपमुख्यधिकारी दिलीप साळवे यांनी प्रस्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत व्यंकटी पापुलवार, लेखापाल अश्वीन गोजरे, राजेश राजणीकर, उदय पटेल, सुभाष तुसामकर, कैलास मगरे, चंद्रकांत पगारे, अशोक मगरे, रऊफ शेख, दारासिंग साळवे यांनी केले.

शिवसेना नगरसेवक गैरहजर
नगरपालिककेत निवडून आलेल्या संख्याबळानुसार, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे. आघाडीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष व भाजपचा स्वीकृत सदस्य होणार आहे. याप्रकरणी काही दिवसापासून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुप्त बैठका सुरू आहेत. याकारणाने शिवसेना भाजपवर नाराज आहे. त्याचा प्रत्यय बुधवारी झालेल्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात आला. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकाना निमंत्रण देवूनही एकही शिवसेना नगरसेवक यावेळी उपस्थित राहिला नाही.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *