facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / बंधपत्रित परिचारिका नियुक्तीत पायमल्ली

बंधपत्रित परिचारिका नियुक्तीत पायमल्ली

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – आरोग्यसेवेत परिचारिकांना पाठीचा कणा म्हटले जाते. शुश्रूषेत डॉक्टरांइतकेच परिचारिकांना महत्त्व दिले जाते. त्यामुळे हे मनुष्यबळ तंत्रशुद्ध प्रशिक्षित असावे, असा दंडक पाळला जातो. मात्र, सोमवारीपेठ येथील राज्य कामगार विमा रुग्णालयाने याला हरताळ फासला असल्याची बाब उघड झाली आहे. बंधपत्रिक परिचारिकांच्या नियुक्तीत नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे येथे उपचाराला दाखल होणाऱ्या कामगार बांधवांच्या जीवाशी खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे.

शहरालगतच्या लघु, मध्यम आणि अवजड उद्योगांमध्ये हजारो कामगार घाम गाळतात. त्यांच्या व कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी सोमवारीपेठ परिसरात कामगार विमा रुग्णालय आशेचा किरण आहे. मात्र, येथे गेल्या अनेक वर्षांपासून परिचारिकांची पदे रिक्त आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी १५ परिचारिकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली. या बंधपत्रित परिचारिकांची नियुक्ती करताना शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. बीएचसी नर्सिंग अथवा जीएनएम हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या परिचारिकांना नियुक्ती देण्यात येईल, असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यालाच आता बगल दिली जात आहे. या बंधपत्रित परिचारिकांच्या नियुक्तीची मुदत गेल्या महिन्यात संपुष्टात आली आहे. त्याचे नुतनीकरण करताना एका परिचारिकेची नियुक्ती अवैध रित्या करण्यात आली आहे. या १५ पैकी एका परिचारिकेने एनएनएम अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे ती या नियुक्तीस पात्र ठरत नाही. तरीही तिला नियुक्ती देण्यात आल्याने यावर संशय व्यक्त होत आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *