facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / आईसाठी मुलाचे बँकेच्या निषेधार्थ मुंडण

आईसाठी मुलाचे बँकेच्या निषेधार्थ मुंडण

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – पेन्शनसाठी आवश्यक असलेल्या हयातीचा फॉर्म भरण्यासाठी तीन दिवसांपासून बँकेच्या खेट्या घालणारी एक वृद्ध माता रांगेत ढकलाढकली झाल्याने भोवळ येऊन खाली पडली. आपल्या आईची अशी अवस्था पाहून हताश झालेल्या तिच्या मुलाने मुंडण करून बँकेविरोधात आपला निषेध नोंदवला. रवींद्र अशोक लांडगे असे या तरुणाचे नाव असून गुरुवारी (दि. ५) शहरातील भडगाव रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या प्रवेशद्वारावरच त्यांनी हे आंदोलन केले. दिवसभर या आंदोलनाची आणि बँकेच्या बेफिकिरीची चर्चा शहरात सुरू होती.

शहरातील वामननगर भागात आपल्या मुलासोबत राहणाऱ्या नंदाबाई अशोक लांडगे (६०) या पेन्शनर्स आहेत. मिल कामगार असलेले त्याचे पती हे तीन वर्षांपूर्वी वारले. त्यांच्या पश्चात त्यांना सरकारकडून एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे. पेन्शनसाठी आवश्यक असलेल्या हयातीचा फॉर्म भरण्यासाठी नंदाबाई लांडगे या गेल्या तीन दिवसांपासून बँकेत चकरा मारत होत्या. परंतु, तीन दिवस खेट्या घालूनही त्यांचा अर्ज भरला जात नव्हता. बुधवारी, दुपारी ४ वाजेच्या सुमारास नंदाबाई लांडगे या रांगेत उभ्या असताना गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीतच त्या भोवळ येऊन खाली पडल्या. त्यात त्यांच्या हातातील बांगड्या फुटून त्याचे काच हातात गेल्याने त्या जखमी झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली.

सुबुद्धी मिळो, अशी अपेक्षा

बँकेकडून आईला मिळालेल्या वागणुकीमुळे मुलाच्या मनात चीड निर्माण झाली. त्याचा मनस्ताप झाल्याने अभिनव आंदोलन करून बँकेचा निषेध करण्याचे मुलाने ठरविले. आपल्या या आंदोलनामुळे तरी बँक प्रशासनाला सबुद्धी येईल, अशी अपेक्षा रवींद्र लांडगे यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

सर्व ग्राहकांसाठी एकच रांग

शहरातील बँकांमध्ये गर्दी कमी झाली असताना स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत अजूनही खातेदारांच्या रांगा लागत आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी, काढण्यासाठी तसेच इतर दाखले अथवा अन्य कामांसाठी एकच रांग करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवसभर ताटकळत उभे रहावे लागते. बँक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पेन्शनर्संना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

एकाच वेळी सर्वांचे पेन्शन आल्याने गर्दी झाली. खातेदारांसाठी बसण्याची व पाण्याची व्यवस्था केली आहे. दहापैकी ७ बँक कर्मचारी सुट्टीवर असल्याने कामात अडचणी येत आहेत. पेन्शनर्ससाठी लागणाऱ्या हयातीच्या दाखल्यांसाठी वेगळी सुविधा देऊ.

-जनक गाठेकर, शाखा प्रबंधक

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *