facebook
Monday , February 20 2017
Breaking News
Home / Featured / आर्थिक गुन्हे शाखांसाठी आता पोलीस उपअधीक्षक

आर्थिक गुन्हे शाखांसाठी आता पोलीस उपअधीक्षक

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – आर्थिक गुन्ह्यांच्या कामकाजाकरिता आता जिल्ह्यांसाठी पोलिस उपअधीक्षकांचे स्वतंत्र पद निर्माण करण्यात आले असून, त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र उपअधीक्षक दर्जाचा पोलिस अधिकारी मिळणार आहे. नगरला राज्य गुप्तवार्ता विभाग किंवा विशेष सुरक्षा विभागातून अधिकारी बदलून येणार आहे. सध्या जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आहे.

जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन फसवणूक, बँकेतील फसवणूक, चिटफंड प्रकारातून आर्थिक फसवणूक असे गुन्हे वाढत आहेत. यात सर्वसामान्यांची लाखो रुपयांची फसवणूक होते. या गुन्ह्यांचा तपास पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून काढून तो आर्थिक गुन्हे शाखांकडे दिला जातो. परंतु या गुन्ह्यांचा तपास योग्य प्रकारे होत नसल्याने त्याचा आरोपींना फायदा होतो. तर काही वेळेस पोलिस या आरोपींपर्यंत पोहोचत नाहीत. य़ा शाखेला पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. म्हणूनच या शाखांसाठी पोलिस उपअधीक्षक स्वतंत्र पद निर्माण करून अधिकारी वर्ग करण्याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाने गुरुवारी काढला आहे. राज्यात मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांपैकी ठाणे ग्रामीण जिल्ह्यात उप अधीक्षक दर्जाचे पद अस्तित्वात आहे. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे कमी असल्याने त्या ठिकाणी स्वतंत्रपणे पोलिस उपअधीक्षकांची पद निर्माण करण्यात आलेले नाही. उर्वरित राज्यातील ३२ जिल्ह्यांतील आर्थिक गुन्हे शाखेकरिता उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे पद मंजूर करण्यात आले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *