facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / तर स्वनिधीतून धोबीघाटची उभारणी

तर स्वनिधीतून धोबीघाटची उभारणी

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – शहरात परीट व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. कपडे धुण्यासाठी एकाच ठिकाणी सोय करावी अशी सर्व व्यावसायिकांची मागणी आहे. कोल्हापूर महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी कोल्हापूर परीट समाज स्वनिधीतून धोबी घाट बांधण्याच्या तयारीत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडे ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र प्रशासन उदासीन असल्याची तक्रार व्यावसायिकांची आहेत.

शहरात परीट व्यावसायिकांची ४०० दुकाने आहेत. तर ५० हून अधिक व्यावसायिक कपडे धुण्यासाठी मशिनचा वापर करतात. महापालिकेने इराणी खण क्रमांक दोन येथे धोबीघाट बांधला आहे. मात्र घाटाचे बांधकाम धुणे धुण्याच्या दृष्टीने गैरसोयीचे व चुकीच्या पद्धतीचे झाले आहे. घाटाचे बांधकाम योग्य पद्धतीने करणे व त्यावर पाणी खेचण्यासाठी मोटार पंप बसविण्याचे काम समाज लोकवर्गणीतून करू शकतो असे कोल्हापूर परीट समाजाचे अध्यक्ष दिपक लिंगम यांनी सांगितले.

शिवाजी पेठ, सानेगुरुजी वसाहत परिसरातील परीट व्यावसायिकांना धुणे धुण्यासाठी या धोबी घाटाची गरज आहे. महापालिकेने, बेलबाग येथील गंजीवाली खण येथील घाटाच्या धर्तीवर इराणी खण क्रमांक दोनमधील धोबी घाट येथे लाइट व पिण्याच्य पाण्याची सोय करून परीट समाजाकडे सुपूर्द करावी अशी व्यावसायिकांची मागणी आहे. धोबी घाट विकसित करण्यासाठी आमदार फंडातून निधी मिळावा यासाठी समाज प्रयत्नशील आहे. आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक यांच्याशी चर्चा केली. आमदारांनी निधी देण्याची ग्वाही दिल्याचे समाजाच्या अध्यक्षांनी सांगितले.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या बाजूस ओढ्यालगत ३० गुंठे जागा महापालिकेच्या नावे आरक्षित आहे. धोबी घाटसाठी ही जागा योग्य आहे. महापालिकेने ही जागा उपलब्ध करुन दिल्यास परीट समाज स्वनिधीतून त्या ठिकाणी धोबी घाट बांधण्यास तयार आहे. आसपासच्या जागेचे सुशोभिकरण केले जाईल. या ठिकाणी धोबी घाट तयार झाल्यास पंचगंगा व रंकाळा तलावाचे प्रदूषण बंद होणार आहे.

श​शिकांत भालकर, कार्यकारिणी सदस्य, कोल्हापूर परीट समाज

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *