facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळित

पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळित

आवाज नेव्ज नेटवर्क –

अहमदनगर – नगरमध्ये राबविल्या जात असलेल्या फेज-२ या नव्या पाणी योजनेंतर्गत विळद पंपिंग स्टेशनमध्ये नवा ६०० अश्वशक्तीचा वीज पंप बसविला जाणार असल्याने शनिवारी (७ जानेवारी) मुळा धरणातील पाणीउपसा पाच तास बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे शनिवारपासून तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे.

विळद स्टेशनमधील २०० अश्वशक्तीच्या वीजपंपाच्या जागी ६०० अश्वशक्तीचा नवा पंप बसवून तो नगरकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला जोडला जाणार आहे. याशिवाय सावेडीतील निर्मलनगर व सहकारनगर गॅस गोडावूनजवळील दोन नव्या पाण्याच्या टाक्यांची चाचणीही घेतली जाणार आहे. या कामांमुळे शनिवारी (७ डिसेंबर) सकाळी ११ ते सायंकाळी चार या दरम्यान मुळा धरणातून पाणी उपसा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी उपनगरात तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (८ डिसेंबर) नगरच्या मध्यवर्ती भागात व सोमवारी (९ डिसेंबर) शहरातील राहिलेल्या मध्यवर्ती भागास पाणीपुरवठा होणार नाही.

मुळा धरणातून अखंड होणारा पाणी उपसा शनिवारी पाच तास बंद राहणार असल्याने वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत पुरेसे पाणी पोचणार नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी ११नंतर पाणी मिळणार असलेल्या बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, केडगाव, कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागास पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी (ता.आठ) मंगलगेट, झेंडीगेट, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागासह गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको आदी भागास पाणीपुरवठा होणार नाही. या भागास सोमवारी (ता. ९) पाणी दिले जाणार असून, या दिवशी पाणी पुरवठा होणार असलेल्या सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, नालेगाव, माळीवाडा भागास मंगळवारी (ता. १०) पाणी दिले जाईल.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *