facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / मुंबई / पालिका निवडणुकीत उमेदवारीत घराणेशाहीच

पालिका निवडणुकीत उमेदवारीत घराणेशाहीच

महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी फील्डिंग लावली आहे. आरक्षणात मुंबईतील अनेक नगरसेवकांचे प्रभाग महिला प्रवर्गात गेले. त्यामुळे महिलांच्या प्रभागात आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक सर्वपक्षीय नगरसेवक सज्ज झाले आहेत. नगरसेवकांच्या या घराणेशाहीमुळे सच्चा कार्यकर्ता डावलला जाण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाल्यामुळे ६० टक्के विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग महिला व ओबीसी व अनुसूचित जाती या आरक्षणांसाठी गेले आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवक आपली पत्नी, मुलगा, मुलगी व अन्य नातेवाईकांना निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत अनेक विद्यमान नगरसेवकांची पत्नी, भाऊ, बहीण व अन्य नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक चंदन शर्मा, हारून खान, धनंजय पिसाळ व माजी नगरसेवक अजित रावराणे यांच्या पत्नींचा उमेदवारांमध्ये समावेश आहे. पिसाळ यांची पत्नी भारती पिसाळ व चंदन शर्मा यांची पत्नी चारू शर्मा या माजी नगरसेविका आहेत. तर रावराणे रांची पत्नी विद्यमान नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक व विद्यमान नगरसेविका असलेली बहिण डॉ. सईदा खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मंत्री, खासदापुत्रांचे तिकिटासाठी प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे व समाजवादी पार्टीमध्येही आपल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळावी, यासाठी नेते व नगरसेवक प्रयत्नशील आहेत. भाजपचे आमदार राज पुरोहित, विद्या ठाकूर, प्रकाश मेहता, खासदार किरीट सोमय्या हे नेते आपल्या मुलांसाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नियाज वणू यांनी आपल्या मुलाला तिकीट देण्याच्या बोलीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सेनेतही इच्छुकांची फील्डिंग

शिवसेनेतही डझनभर नगरसेवक पत्नी व मुलांना उमेदवारी मिळावी, यासाठी मातोश्रीच्या संपर्कात आहेत. नुकतेच मनसेतून सेनेत आलेले माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळण्याच्या अटीवरच सेनेत प्रवेश केला आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *