facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / मुंबई: ऑफिसहून परतणाऱ्या महिलेवर हल्ला

मुंबई: ऑफिसहून परतणाऱ्या महिलेवर हल्ला

बेंगळुरू येथील विनयभंगाच्या घटनांमुळं देशभरात संताप व्यक्त होत असतानाच गुरुवारी रात्री मुंबईत ताडदेव येथे एका महिलेवर अज्ञात इसमांनी हल्ला केला. हल्ल्यात ही महिला जखमी झाली असून तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

पीडित महिला ऑफिसहून तिच्या घरी परतत असताना हा हल्ला झाला. रेसकोर्स भागात पोलिसांची नाकाबंदी सुरू असतानाच हा हल्ला झाला. विशेष म्हणजे या परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरू असतानाच ही घटना घडली. हल्ल्या झाल्यानंतर काही वेळानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. हा हल्ला कोणी व का केला हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *