facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / लाल दिव्यांची पुन्हा प्रतिक्षाच

लाल दिव्यांची पुन्हा प्रतिक्षाच

राज्यातील दोन्ही काँग्रेससह इतर काही पक्षाचे बडे मासे गळाला लागावेत यासाठी भाजपच्यावतीने महामंडळांचे गाजर दाखवण्यात येत आहे. या ‘इनकमिंग’च्या प्रतिक्षेत महामंडळाच्या नियुक्त्या लांबणीवर पडत आहेत. आठ दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने अनेकांची लाल दिव्याची प्रतिक्षाच वाढणार आहे. या निवडणुकीत ‘ताकद दाखवा, लाल दिवा मिळवा’ असा सुचक इशारा भाजपने दिल्याचे समजते.

राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार सत्तेवर येऊन सव्वा दोन वर्षे उलटली. मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून अनेकजण प्रतिक्षेत होते. पण विस्तारातही काही जागा रिक्त ठेवल्याने महामंडळाचा तरी लाल दिवा मिळावा म्हणून गेली सहा महिने काही जण प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळ रचनेत भाजपने सर्वच मित्र पक्षांची बोळवण केल्याने किमान महामंडळ नियुक्तीत तरी चांगला वाटा मिळेल या आशेवर मित्र पक्ष आहेत. पण महामंडळ वाटपाचा फॉर्म्युलाच ठरत नसल्याने मित्र पक्ष चिंतेत आहेत.

महामंडळासाठी भाजप-सेनेसाठी ७०-३० आणि ६६-३३ चा फॉर्म्युला चर्चेत आहे. उर्वरित एकच टक्का मित्रपक्षासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. पण हा प्रस्ताव अमान्य करत सेनेने भाजपकडे जादा महामंडळांची मागणी केली आहे. राज्यात सरकार स्थापन होऊन सव्वा दोन वर्षे उलटली आहेत. पण तीन-चार महामंडळे वगळता सर्वच महामंडळावर कोणीचीच नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी या महामंडळाचे गाजर दाखवण्यात येत आहे. काही बडे मासे गळाला लागावेत यासाठीच ही महामंडळावर नियक्ती करण्यात विलंब लावला जात आहे. नगरपालिका निवडणुकीत राज्यात चांगले यश मिळाल्यानंतर भाजपला आता जिल्हा परिषदेचे वेध लागले आहेत. ग्रामीण भागात पक्ष विस्तारासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत ‘ताकद दाखवा, महामंडळ मिळवा’ असा सूचक इशाराच पक्षाने दिला आहे. यामुळे पक्षात येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

चौकट

एकाचवेळी होणार नियुक्त्या

दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही महामंडळावर नियुक्त्या होण्याची शक्यता होती. तसा शब्द काहींना दिला होता. यामुळे काहींनी पक्षात प्रवेश केला. पण सर्व नियुक्त्या एकाचवेळी करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. यामुळे शब्द मिळालेले अनेक नेते आता प्रतिक्षेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना म्हाडाचे अध्यक्षपद देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. याबाबत कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजते. पण इतर नियुक्त्या निश्चीत होत नसल्याने ही नियुक्ती रखडली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीबाबतही हीच स्थिती आहे.

पक्षातील कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी लवकर महामंडळावर नियुक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या तर आचारसंहितेमुळे या नियुक्त्या लांबणीवर पडण्याचीच दाट शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *