facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / ३१ जानेवारीला मुंबईत मराठा मोर्चा

३१ जानेवारीला मुंबईत मराठा मोर्चा

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – राज्यभर मूक मोर्चे निघाल्यानंतरही राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवणे या मागण्यांसाठी मुंबई येथे ३१ जानेवारीला राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात क्रांती मोर्चाचे राज्य कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आकाशवाणी चौकातील बिग बाजार इमारतीत गुरुवारी सकाळी पाच विद्यार्थिनींच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यभरातील तीन हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यस्तरीय मोर्चाचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आली. येत्या ३१ जानेवारीला मुंबईत राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा व तालुकास्तरावर बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली जाणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यात समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र सेल उघडण्यात आला आहे. या माध्यमातून फेसबुक, व्हॉटसअॅप या सोशल साइटसह दैनंदिन बैठकांचे नियोजन केले जाणार आहे.मेटे यांना विरोध

या बैठकीत आमदार विनायक मेटे बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. आमदार असूनही विधान परिषधेत आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे मांडत नसल्याचा आरोप करण्यात आला, तर शिवस्मारक आणि आरक्षणाच्या मुद्यावर नेहमी आग्रही आहे, असे मेटे यांनी सांगितले, मात्र काही वेळ कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *