facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / नागपूरकर चिमुकलींनी जिंकले डेहराडून

नागपूरकर चिमुकलींनी जिंकले डेहराडून

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – डेहराडून येथे आयोजित अखिल भारतीय बहुभाषिक नृत्यस्पर्धेत नागपूरकर चिमुकलींनी आपल्या पदलालित्याने रसिकांची मने जिंकली. ‘जागतिक रंग महोत्सव’अंतर्गत हे आयोजन यूनिव्हर्सल सांस्कृतिक शोध नाट्य अॅकेडमीतर्फे २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान करण्यात आले होते.

ही अॅकेडमी युनेस्कोची सदस्य असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. देश व देशाबाहेरील दोन हजारांवर स्पर्धक मुलींनी यात भाग घेतला होता. क्लासिकल, सेमीक्लासिकल, मॉडर्न असे नृत्यप्रकार यावेळी सादर झाले. यशस्वी स्पर्धकांना कुशल भट्टाचार्य, सौरभ चौहान, विदिशा अग्रवाल या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्रे देण्यात आलीत. या स्पर्धेत नागपूरच्या श्रीकृष्ण नृत्यालयाच्या शर्वणी धोपटे, अर्णवी काळे, राही गुहे, अल्योना मॅथ्यू, अविका ठाकूर, श्रेया रस्तोगी, आनंदी घरडे, महक कासलीकर या नृत्यांगनांनी सहभाग घेतला होता. या चिमुकल्या नृत्यांगना प्रमिला उन्नीकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवितात.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *