facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / नोटबंदीविरोधात मोर्चा

नोटबंदीविरोधात मोर्चा

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना नोटबंदीमुळे त्रास सहन करावा लागला असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला
असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना त्रास झाला असल्याचा आरोप करीत काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे. सरकारच्या निर्णयाला पन्नास दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेल्यानंतरही परिस्थिती पूर्वपदावर आली नसल्यामुळे महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी थाळीनाद आंदोलन केले होते. तर, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शनिवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर तेथून केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन कार्यकर्त्यांचा मोर्चा सुरू झाला. हा मोर्चा बंगाल चौकी, जुना बाजार, धरती चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारांतून आत प्रवेश केला. परंतु सर्वच पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी प्रवेशद्वाराच्या आत सोडले नाही. त्यामुळे निवेदन देण्यापूर्वी सभा घेण्याचा निर्णय घेऊन प्रवेशद्वारातून आत गेलेले पदाधिकारी पुन्हा बाहेर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा झाली. सभेमध्ये पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करीत व घोषणाबाजी करुन निषेध केला. आंदोलनामध्ये काँग्रेसचे निरीक्षक प्रताप दुधाट व फाजल अन्सारी, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके, महिला काँग्रेसच्या अनुराधा नागवडे, कांचन मांढरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

मतदारांना काय पाहिजे की आमच्या भागाचा विकास कोणी केला – मंगला कदम

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *