facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / बेशिस्तांची उडाली धावपळ!

बेशिस्तांची उडाली धावपळ!

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – शहरातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्यावर बेशिस्त पार्किंग विरोधात वाहतूक पोलिसांनी शनिवारी अचानक मोहीम राबविल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच धावपळ आणि धरपकड झाली. बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांसह ज्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती अशा वाहनधारकांकडूनदेखील दंडाची आकारणी करण्यात आली.

गणेश कॉलनी ते कोर्ट चौक दरम्यानचा रस्त्यावर चाकरमान्यांसह कॉलेज तसेच शालेय विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. हा रस्ता १८ मीटरचा असला तरी रस्त्यामध्ये असलेले पोल व अतिक्रमण यामळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवितांना अक्षरश: जीव मुठीत ठेवावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावर लागणाऱ्या बेशिस्त वाहनांचादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

दहा मीटरच रस्ता उरला

नूतन मराठा कॉलेज ते ख्वाजामियॉ चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. यामुळे १८ मीटरचा रस्ता केवळ दहा मीटर शिल्लक राहत असतो. यामुळे वाहनधारक व पायी चालणाऱ्यांना कसरत करावी लागते. रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगबद्दल वाहतूक शाखेकडे तक्रार करण्यात आल्याने शनिवारी या रस्त्यावर सकाळी ११ वाजेपासून बेशिस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत अनेक वाहनधारकांना दंड आकरण्यात आला.

सकाळी शाहू मार्केटसमोर अचानक वाहतूक पोलिसांचे पथक पोहचले. त्यानंतर बेशिस्त वाहनांजवळ थांबून वाहन काढण्यास आलेल्यांकडून २०० रुपये दंड वसुलीस सुरुवात केली. बेशिस्त वाहनांवर कारवाई सुरू असल्याची वृत कळताच इतर वाहनधारकांनी वाहने काढण्यास सुरुवात केली. पोलिस एकावर कारवाई करत नाही तोपर्यंत दुसरीकडे काही वाहनधारकांनी नजर चुकवून धूम ठोकल्याने या ठिकाणी धावपळ उडाली. ७ ते ८ पोलिसांनी वाहनधारकांना मागे लागून दंड वसूल केला.

वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर दुचाकीने दोनपेक्षा जास्त सीट घेवून जाणारे तसेच चित्रविचित्र नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकांनाना थांबवून दंड केला. वाहनधारकांची तपासणी करून विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली.

Check Also

मतदारांना काय पाहिजे की आमच्या भागाचा विकास कोणी केला – मंगला कदम

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *