facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / भाजप हा फासेपारधी

भाजप हा फासेपारधी

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – भाजपचे लोक हे फासेपारधी असून, ते पैसा व उमेदवारीचा फास टाकून पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न करतील. अशा फासे पारध्यांपासून राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी सावध रहावे, असा सल्ला आमदार व राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी दिला.

येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या ‘सत्तेची भाकरी फिरवा’ या सल्ल्यावार खरे उतरून निवडणुकीत जुने चेहरे बाजुला करून नवीन चेहऱ्यांना संधी द्या. निष्ठावान कार्यकर्ते तयार करा. खऱ्या कार्यकर्त्याला बळ द्या असे सांगत स्वपंक्षीयांची कानउघाडणी देखील आमदार पाटील यांनी मेळाव्यात केली.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शशिकांत सांळुखे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश राजपूत, छाया महाले, पंचायत समितीच्या सभापती आशालता सांळुखे, माजी सभापती विजय जाधव, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, विकास पवार उपस्थित होते.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजपूत मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषद निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर होत असलेल्या या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यास महत्व प्राप्त आले होते. नेत्यांकडून पराभवाची काय कारणमीमांसा देण्यात येते हे ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठी गर्दी केली होती.

हेलीकॉप्टरने पैसा आला!
नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला नसून, धनशक्तीचा विजय झाला आहे. निवडणुकांच्या वेळी हेलीकॉप्टरने पैसा आल्याचा आरोप आमदार सतीश पाटील यांनी मेळाव्यात केला. जिल्ह्याला तीन महिन्यात तीन पालकमंत्री मिळाल्याची टिकाही त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यासेाबत फिरणारे कार्यकर्ते हे प्रामाणिक आहेत का हे तपासावे, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही नेत्याची परीक्षा असल्याचे देखील त्यांनी मेळाव्यात ठणकावून सांगितले.

शहराच्या हितासाठी विरोधात बसलो
नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार उन्मेश पाटील यांच्याकडून शहराच्या विकासाठी शंभर कोटी देणार, असे आश्वासन दिले होते. ‘एक जीतसे कोई सिंकदर नही बनता और एक हार से कोई फकिर नही बनता’, असा टोला माजी आमदार राजीव देखमुख यांनी हाणला. काळा पैसा वाटला गेला म्हणून ७ उमेदवारांचा केवळ १०० मतांनी पराभव झाला. तालुक्याचा विकास थांबला असून, याचा जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *