facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / भिलवडी सुन्न

भिलवडी सुन्न

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी (ता. पलूस) पंचक्रोशीत शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी मोर्चा काढून भावना व्यक्त केल्या तसेच सायंकाळी महिलांनी कँडल मार्चही काढण्यात आला. या अमानवी घटनेमुळे भिलवडी शनिवारी सुन्न होती.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चारही संशयितांच्या चौकशीत पोलिसांच्या हाती अजून तरी काही लागलेले नाही. तपासासाठी पोलिसांची पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे भिलवडीत तळ ठोकून आहेत. शनिवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही भिलवडीत येऊन पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली.

या घटनेनंतर शनिवारी अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचे कार्यकर्ते भिलवडीत पोहोचले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, राष्ट्रवादीच्या युवा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, शिवसेनेच्या सुनीता मोरे आदींनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. शुक्रवारी रात्री तणावपूर्ण वातावरणात भिलवडीतील कृष्णानदीकाठी पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्मशानशांतता असलेल्या भिलवडीत सकाळी साडेनऊच्या सुमारास मोठी निषेध फेरी काढण्यात आली. पाच युवतींनी पलूसचे तहसीलदार आणि पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हेगारांचा शोध त्वरित घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. भिलवडीसह माळवाडी, धनगाव, अंकलखोप, औदुंबर आदी गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. सायंकाळी पुन्हा महिला आणि युवतींनी उत्स्फूर्तपणे कँडल मार्च काढून शाळकरी मुलीवर अत्याचाराचा निषेध केला.

नवीन कपडे घालण्यावरून वाद

पीडित मुलगी आणि तिची आई यांच्यामध्ये नवीन कपडे घातल्याच्या कारणावरून गुरुवारी रात्री वाद झाल्याची माहिती शनिवारी समोर आली. काही दिवसांपूर्वी पीडितेची छेड काढल्याच्या कारणावरून तिच्या चुलत भावाने काही जणांना जाब विचारला होता. एकतर्फी प्रेमप्रकरणाचा काही पदर या प्रकरणाला असावा, अशी चर्चा गावात होती.

या प्रकरणाचा तपास स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक शिंदे करीत आहेत. अफवावंर विश्वास न ठेवता जनतेने पोलिसांना सहकार्य करावे.

विश्वास नांगरे-पाटील

विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्

या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून, त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. या खटल्याचा तपास जलद गतीने व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

सदाभाऊ खोत

कृषी राज्यमंत्री

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *