facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / मुलीने गमावली करंगळी

मुलीने गमावली करंगळी

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – कांदिवली ठाकूर इंटरनॅशनल शाळेतील शिक्षकाच्या निष्काळजीमुळे पाच वर्षीय मुलीला करंगळी गमवावी लागली आहे. जीविका मिस्त्री असे या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने ठाकूर इंटरनॅशनल शाळेविरोधात कांदिवली पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. सीनिअर केजीच्या वर्गात शिकणाऱ्या जीविकाचे बोट दरवाजात चिमटले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्स्त्राव झाला. मात्र तिला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी शिक्षकांनी शाळेतच प्रथमोपचार सुरू ठेवले. या निष्काळजीपणामुळे मुलीच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली.
कांदिवलीच्या डहाणूकरवाडीच्या अप्सरा बिल्डिंगमध्ये जिविका आई-वडिलांसोबत रहाते. ४ जानेवारीला ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. वर्गात जात असताना एका शिक्षकाने जोरात दरवाजा ढकलल्यामुळे जिविकाची करगंळी त्यामध्ये अडकली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शिक्षकांनी तिच्यावर शाळेत प्राथमिक उपचार केले. मात्र रक्तस्त्राव आणि करंगळी तुटल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी जीविकाच्या वडिलांना फोनद्वारे घडलेली घटना सांगितली. जीविकाची आई तातडीने शाळेत दाखल झाली. यानंतर अंधेरीच्या कोकीळाबेन रुग्णालयात तिच्या करंगळीवर शस्त्रक्रिया झाली.
या प्रकरणी पोलिसांकडून शाळेतील सीसीटीव्ही फूटेजचा आढावा घेतला जात आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *