facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / रासप, स्वाभिमानी, शिवसंग्राम एकत्र

रासप, स्वाभिमानी, शिवसंग्राम एकत्र

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांना अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत प्रबळ लढा देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम संघटना यांनी आज एकत्र बैठक घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
येथील गणेश हॉलमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास मासाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शिवसंग्रामचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, तालुका अध्यक्ष संतोष वाळूंजकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील लोंढे, रासप युवक तालुका अध्यक्ष गणेश सुळ, डॉ. सुरेश भोरे, रासप महिला जिल्हाध्यक्ष अनिता काळे, आशाताई पवार, ऋषीकेश डुचे, डॉ. बाबा चंदन, डॉ. प्रकाश कारंड़े, महादेव बहीर, दिपक भवाळ, रंजीत म्हस्के, लखण जमदाडे आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष अमजद पठाण म्हणाले, भाजप सरकार महायुती म्हणून मित्रपक्षाचे झेंडे लावून वापर करीत आहेत. प्रत्यक्षात सत्तेत वाटा देत नाहीत. वेळोवेळी मित्रपक्षांना टाळत आहेत. आता त्यांना जागा दाखवलीच पाहिजे. अगामी निवडणूकीत तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आमच्या तीन पक्षाची अभेद्य युती राहिल, असे पठाण म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील लोंढे म्हणाले, सत्तेत असताना आम्ही दुष्काळी परिस्थितीत चारा छावणी, दूध दर तसेच मराठवाड्याप्रमाणे सवलती मिळाव्यात म्हणून मोर्चा, रस्तारोको केले. भाजपवाले तालुक्यात युतीबाबत बोलत नाही.

रासप तालुका अध्यक्ष विकास मासाळ म्हणाले, भाजपच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आम्ही मित्रपक्ष एकत्र आलो आहे. आमची उमेदवार यादी तयार आहे. आम्ही फक्त तारीख जाहीर व्हायची वाट पाहात आहोत. मंत्री व प्रमुख नेत्यांनी सभा देण्याचे जाहीर केले आहे. नगरपरिषदेमध्ये आम्ही मित्रपक्षाने भाजपला हिसका दाखवला आहे. आत्ता पुन्हा पुनरावृत्ती करू असे मासाळ म्हणाले. सूत्रसंचालन सुग्रीव तोंडे यांनी केले तर शहाजी गोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार अनिल श्रीरामे यांनी मानले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *