facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / सिध्द‌वििनायक कॉलनीत सव्वालाखाची घरफोडी

सिध्द‌वििनायक कॉलनीत सव्वालाखाची घरफोडी

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – पिंप्राळा येथील सिल्क म‌लिजवळ असलेल्या सिध्द‌वििनायक कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लांबविला. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. जळगावात दररोज घरफोडीच्या घटना होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेतेबाबत प्र्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

येथील पिंप्राळा परिसरात असलेल्या सिल्कमिल भागातील सिध्दीविनायक कॉलनीत सचिन डगवाल हे परिवारासह राहतात. सचिन डगवाल १ जानेवारीला कुटुंबीयांसोबत नागपूर गेले होते. ६ जानेवारीला रात्री १० वाजता घरी परतल्यावर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ३० ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, १५ ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, ५ ग्रॅम कानातील रिंग, २ ग्रॅम लेडीज अंगठी असा एकूण १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

श्वान पथकाकडून तपासणी

डगवाल यांनी रामानंद पोलिसांना घटनेची माह‌तिी दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांकडून तपासणी केली. याबाबत डगवाल यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला. पीएसआय राजेश घोळवे करीत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *