facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / अहमदनगर / ‘आर्थिक आमिषाने धर्मांतरास विरोध’

‘आर्थिक आमिषाने धर्मांतरास विरोध’

‘धर्मांतराला आमचा कोणताही विरोध नाही. परंतु आर्थिक आमिष दाखवून बौद्धांचे ख्रिश्चन धर्मात जे धर्मांतर केले जाते, त्याला विरोध आहे. भारत बौध्दमय करण्यासाठी बाबासाहेबांचा अजेंडा तयार असून, त्यानुसार प्रत्येकाने काम करण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.

भिंगार येथील सिद्धार्थ बौद्ध विहारात आयोजित मेळाव्यात ‘भारताला बौद्धमय करण्याची योजना’ या विषयावर आंबेडकर बोलत होते. यावेळी राज्य संपर्कप्रमुख सिद्धार्थ मोकळ, राज्य महासचिव नवनाथ खांडेकर, दादासाहेब गायकवाड, टी. एस. धीवर, एस. के. धवन, जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, मेजर अनिल ओहोळ, अॅड. भानुदास होले, अॅड. महेश शिंदे, पोपट बनकर उपस्थित होते.

‘हिंदूंना दहा मुले जन्माला घालण्याची भाषा करणाऱ्यांचा भारतात अहिंसा पसरविण्याचा विचार असल्याचे सांगून, आंबेडकर पुढे म्हणाले, ‘जगाला शांती व प्रगतीसाठी बुद्धांच्या विचाराची गरज आहे. अनेकदा भाषणात महापुरुषांचे विचार सांगितले जातात. मात्र, माईक सोडल्यावर कार्यकर्त्यांना स्वत:च्या कामातच गुंतवले जाते. बाबासाहेब आंबेडकरांचा अजेंडा सांगण्यासाठी राज्यभर गावपातळीवर जाऊन बैठका घेतल्या जातील. बौद्ध धर्मामधील भेसळ टाळण्यासाठी धार्मिक व विज्ञानवादी विद्यापीठ स्थापन होण्याची आवश्यकता आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध न करता त्यांना सहकार्य करावे. आपल्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना त्यांचे आरक्षण मिळणार आहे. परंतु कितीही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले तरी अॅट्रॉसिटी कायदा बदलला जाणार नाही.’

भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात सुभाष आल्हाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भिंगारला दिलेल्या भेटीची माहिती दिली. यावेळी ‘भीमा कोरेगावचा महासंग्राम’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. बौद्ध विहाराच्या परिसरात राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरज ससाणे, संजय गवारे, नयना बनकर, विजय मिसाळ, पंकज लोखंडे, संतोष धीवर, अॅड. अमोल जाधव, नंदकुमार बनसोडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यानंतर आंबेडकर यांनी सिध्दार्थनगर, माळीवाडा, अरणगांव येथील बौद्धविहारांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *