facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / नाशिक / बोगस भरती प्रकरणी तीन जणांना अटक

बोगस भरती प्रकरणी तीन जणांना अटक

आदिवासी विकास विभागाची बनावट वेबसाइट तयार करून बनावट नियुक्तीपत्र देत एकाकडून साडेदहा लाख रुपये उकळणाऱ्या सहा जणांविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या टोळीने आणखी किती जणांना लुबाडले याचा तपास पोलिस करीत आहेत.

या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी सचिन परदेशी, पप्पू उर्फ सुरेश पाटील, अमित लोखंडे, पठाण, आधार बाविस्कर, केतन पाटील, तुकाराम पवार आदींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच हेमंत सिताराम पाटील (३१, रा. ९७, गवळेनगर, देवपूर, धुळे) सुरेश गोकुळ पाटील (३४, रा. प्लॉट क्रमांक ९, तुळशीराम नगर, देवपूर, धुळे ) आणि तुकाराम रामसिंग पवार (५६, रा. मु.पो. तामसवाडी, ता. पारोळा, जि. जळगाव) यांना अटक केली. या प्रकरणी संदीप कौतिक पाटील (रा. मु. पिंपळवाड म्हाळसा, पो. टाकळी, चाळीसगाव) याने फिर्याद दिली आहे.

संशयित आरोपींनी मिळून आदीवासी विकास विभागाच्या चिन्ह्यांचा वापर करीत बनावट वेबसाइट सुरू केली. या माध्यमातून त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना शिक्षक व इतर नोकऱ्या देण्याचे अमिष दाखवले. याच पध्दतीने त्यांनी संदीप पाटील यास फसवले. प्राथमिक शिक्षकाची नोकरी देण्याचे अमिष दाखवून संशयित आरोपींनी संदीपकडून १० लाख ५० हजार रुपये उकळले. यानंतर संशयितांनी बनावट नियुक्तीपत्र तयार करून त्यावर अपर आयुक्त म्हणून बनावट सही तसेच शिक्का मारून शासकीय पत्र तयार केले. हे पत्र दिल्यानंतर उर्वरित सहा लाख ५० हजार रुपये संदीप संशयितांना देणार होता. मात्र, संशयितांचे बिंग फुटले.

संशयितांकडून जिवे मारण्याची धमकी
नोकरीसाठी दिलेले साडेदहा लाख रुपये परत देण्याबाबत फिर्यादी संदीप पाटीलने संशयिताकडे तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी संदीपला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास क्राइम ब्रँचच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक एन. एस. माईनकर करीत आहे. दरम्यान, सं‌शयित आरोपींनी बनावट वेबसाईट सुरू केली होती. त्या माध्यमातून केवळ नाशिकच नव्हे तर अन्य जिल्ह्यांमधीलही तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसही त्या दिशेने तपास करीत आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *