facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नाशिक / ‘माणुसकीची भिंत’ देतेय मायेची ऊब

‘माणुसकीची भिंत’ देतेय मायेची ऊब

मोठ्या शहरात सुरू झालेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम आता थेट शाळांपर्यंत पोहोचला आहे. यातून शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे, त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने मविप्र कळवण तालुका संचालक रवींद्र देवरे यांच्या प्रेरणेने बेज येथील महात्मा फुले विद्यालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.

उपक्रमाचे उद््घाटन मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष अशोक पवार, प्रभाकर निकम, दशरथ बच्छाव, प्रल्हाद देवरे, क्रांती देवरे आदी उपस्थित होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दररोज सकाळी शाळा भरल्यानंतर शाळेकडून या भिंतीजवळ ठेवण्यात आलेल्या वस्तूंचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जात असल्याचे मीरा आहेर यांनी सांगितले.

आपल्याकडील स्वेटर, कपडे, मुलांचे कपडे यांसारख्या वापरातील मात्र अनेक दिवसांपासून पडून असलेल्या सुस्थितीतील वस्तू या भिंतीसमोर ठेवल्या जातात. ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे, तो ती वस्तू घेऊन जातो. या भिंतीला टेकून टेबल बनविण्यात आलेल्या ठिकाणी, शाळेत येणारी मुले तसेच मुलांना सोडण्यासाठी येणारे पालक आपल्या पाल्याकडे असलेले अधिकचे साहित्य, स्केचपेन, स्कूल बॅग, वॉटर बॅग, पेन, पेन्सिल, युनिफॉर्म, बूट, माेजे यांसारखे साहित्य आणून ठेवत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना यातील ज्या साहित्याची आवश्यकता आहे ते विद्यार्थी त्या साहित्याची शिक्षकांकडे मागणी करतात. शिक्षक त्या साहित्याची विद्यार्थ्यांना वाटणी करत असून एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकच साहित्य हवे असल्यास पुढील आठवड्यात तसे साहित्य आल्यास देण्याचे आश्वासनही दिले जाते.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *