facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / मुंबई / विक्रम हुकला आणि झालाही!

विक्रम हुकला आणि झालाही!

काळाचौकी येथील चाळीत राहणाऱ्या मुकुंद गावडे या तरुणाने नेटमध्ये सलग शंभर तास फलंदाजी करून जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न केला खरा, परंतु वैद्यकीय अडचणीमुळे त्याला शंभर तासांचा पल्ला गाठता आला नाही. मात्र, त्याची ही ७२ तासांची फलंदाजीही एक विक्रम ठरला असून, त्याच्या नोंदीसाठी मुकुंदने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडे दावा केला आहे.

दादर येथील शिवाजी पार्कच्या बंगाल क्लब नेटवर मुकुंदने बुधवार, ४ जानेवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून फलंदाजी करायला सुरुवात केली होती. विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शंभर शतकांच्या खेळीला मानवंदना देण्यासाठी मुकुंद हा विक्रम करण्याचा मार्गावर होता. परंतु, शनिवारी रात्रौ १ वाजता मुकुंदची शारीरिक स्थिती बिघडली. त्याच्या मित्रांनी त्याला खेळ थांबण्याची विनंती केली. परंतु तो खेळी थांबवायला तयार नव्हता. शेवटी डॉक्टरांच्या सांगण्यावरून सलग ७२ तास २१ मिनिटांच्या खेळीनंतर मुकुंदने बॅट खाली ठेवली. त्याने एकूण ४ हजार ३३३ षटकांचा सामना केला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुकुंदची शारीरिक आणि मानसिक स्थिती अस्थिर झाली होती. पुढे सतत खेळत राहिल्यास ती अधिक बिघडत जाण्याची शक्यता होती.

यापूर्वी अशाप्रकारे सलग फलंदाजी करण्याचा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ पुण्याच्या विराग मारे आणि साऊथ आफ्रिकेचा एरिक ड्यूसिंगझिमाना या फलंदाजांच्या नावे होता. त्यांनी अनुक्रमे ५० तास ४ मिनिटे आणि ५२ तास असा विक्रम नोंदवला होता. मुकुंदने मात्र हे दोन्ही रेकॉर्ड मोडले आहेत.

‘शंभर तासांचा पल्ला गाठू शकलो नाही याची खंत आहे. परंतु, माझ्या या विक्रमाच्या निमित्ताने मुंबईकरांकडून आर्थिक मदतीच्या स्वरूपात हजारो रुपये जमा झाले आहेत. ही मदत आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च होणार आहे, याचे मला समाधान आहे. येत्या वर्षात मी पुन्हा एकदा शंभर तासांच्या फलंदाजीचा विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न करेन.’
– मुकुंद गावडे

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *